नागपुरात आरोपींना तीन प्रकरणांत शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:43 AM2018-04-20T01:43:24+5:302018-04-20T01:43:42+5:30

सत्र न्यायालयाने गुरुवारी अजनी, एमआयडीसी व मौदा पोलिसांच्या हद्दीतील प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा सुनावली.

Education in three cases in Nagpur |  नागपुरात आरोपींना तीन प्रकरणांत शिक्षा

 नागपुरात आरोपींना तीन प्रकरणांत शिक्षा

Next
ठळक मुद्देसत्र न्यायालय : अजनी, एमआयडीसी, मौदा येथील प्रकरणे


लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी अजनी, एमआयडीसी व मौदा पोलिसांच्या हद्दीतील प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा सुनावली.
एमआयडीसी येथील खूनी हल्ला प्रकरणात आरोपी अशोक छिलनलाल श्रीवास (४६) याला ५ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी राजीवनगर येथील रहिवासी आहे. न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला. ही घटना २५ फेब्रुवारी २०१५ रोजी घडली होती. लेकुराम बनोटे (४०) असे जखमीचे नाव आहे. आरोपीने बनोटे यांना धारदार शस्त्राने वार करून जखमी केले होते.
अजनीतील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपी सुधाकर बळीराम इंगोले (६७) याला ३ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ४ महिने अतिरिक्त कारावास या कमाल शिक्षेसह अन्य शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी हा निर्णय दिला. ही घटना ४ जुलै २०१२ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी १५ वर्षे वयाची होती. मौदा येथील सशस्त्र हल्ला प्रकरणात आरोपी तुकाराम श्यामराव उके (४०) याला ३ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायायीश एस. एस. दास यांनी हा निर्णय दिला. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. वशीम काझी, अ‍ॅड. आसावरी पळसोदकर व अ‍ॅड. माधुरी मोटघरे यांनी बाजू मांडली.

Web Title: Education in three cases in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.