करटी केंद्रात शैक्षणिक साहित्य निर्मिती
By admin | Published: January 31, 2017 03:21 AM2017-01-31T03:21:23+5:302017-01-31T03:21:23+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नवोपक्रमशिल केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांच्या मार्गदर्शनाखाली समूह
नवोपक्रमांवर भर : विद्यार्थी जलद गतीने होणार प्रगत
परसवाडा : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नवोपक्रमशिल केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांच्या मार्गदर्शनाखाली समूह साधन केंद्र करटी (बु.), पं.स. तिरोडा येथे शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रगतशिल विद्यार्थी जलद गतीने प्रगत होण्यासाठी आर.बी. घोष यांनी आपल्या केंद्रांतर्गत शिक्षकांची साहित्य निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेला केंद्रातील एन.यू. रहांगडाले, पी.डी. देशमुख, जी. आर. पटले, एल.एम. बारापात्रे, डी.ए. बिसेन, जे.के. डोंगरे, सुजाता चव्हाण, शारदा पारधी व दिलीप हिरापुरे यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. निकष कार्ड पेटी, शब्द चक्र, वाक्यचक्र, बॉल गेम, दिवस व महिने रचनावादी चार्ट इत्यादी साहित्याची निर्मिती कार्यशाळेत करण्यात आली. केंद्रांतर्गत सर्व वर्गामध्ये मिळालेल्या अनुदानातून शिक्षक साहित्य निर्मिती करुन अध्यापन करतील.
कार्यशाळेत तयार केलेल्या साहित्यामुळे दोन हजार वाक्य तयार करणे, वाक्य रचना करणे, इंग्रजी वाक्य तयार क रणे, गणितीय प्राथमिक क्रिया करणे, अल्फाबेट मधील लहाना मोठेपणा ओळखणे, प्रगत व प्रगतशील विद्यार्थी करु शकतील असे केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांनी सांगितले.
शासनाकडून शैक्षणिक सत्र २०१६-१७ साहित्य निर्मितीकरिता प्रतिशिक्षक ५०० रुपये शाळेला मिळालेले आहेत. त्यादृष्टीकोणातून शिक्षकांनी स्वयंनिर्मित साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने व प्रगतशिल विद्यार्थी जलद गतीने प्रगत होण्यास्तव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत उपस्थित शिक्षक आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना शैक्षणिक साहित्य तयार करण्यास्तव मदत करतील, असे केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांनी सांगितले. (वार्ताहर)