शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:08 AM2021-02-12T04:08:46+5:302021-02-12T04:08:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक न्याय विभाग पाच स्तंभावर उभा आहे. या पाच विविध स्तंभांना बळकट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक न्याय विभाग पाच स्तंभावर उभा आहे. या पाच विविध स्तंभांना बळकट केल्यास शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे सोयीचे होईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिनेश डोके यांनी येथे केले. या उद्देशाने विदर्भातून कार्यशाळा सुरुवात करण्यात आली असून राज्यातील सर्व विभागात याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून कोविड महामारीमुळे प्रलंबित राहिलेली कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
विदर्भातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल, गृहप्रमुख व निवासी शाळेतील मुख्याध्यापकांसाठी आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय विभागाच्या निरीक्षण शाखेच्या सहायक आयुक्त मनिषा फुले, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, अमरावतीचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख प्रामुख्याने कार्यशाळेस उपस्थित होते.