रोजगाराच्या संधीकरिता उद्योगवाढीसाठी प्रयत्न

By admin | Published: May 30, 2016 02:25 AM2016-05-30T02:25:28+5:302016-05-30T02:25:28+5:30

राज्यात जोपर्यंत उद्योग धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही तोपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाहीत.

Efforts for the growth of employment opportunities for employment opportunities | रोजगाराच्या संधीकरिता उद्योगवाढीसाठी प्रयत्न

रोजगाराच्या संधीकरिता उद्योगवाढीसाठी प्रयत्न

Next

उद्योग राज्यमंत्री पोटे : उद्योग भवन कार्यशाळा
नागपूर : राज्यात जोपर्यंत उद्योग धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही तोपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाहीत. उद्योगवाढीसाठी उद्योजक व कामगारांचे हित जोपासून नवीन कायदा लवकरात लवकर तयार करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज केले.
उद्योग भवनाच्या सभागृहात आज विदर्भ इंड्रस्ट्रीज असोसिएशन, एमआयडीसी इंड्रस्ट्रीज असोसिएशन व बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रवीण पोटे यांनी उद्योजकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर विदर्भ इंडस्ट्रीजचे अतुल पांडे, बीएमआयचे नितीन लोणकर, मिलिंद कानडे, एमआयएचे कॅप्टन सी.एन. रणधीर, एस.आर. वाघ, सुजाता कडू उपस्थित होते. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यावेळी म्हणाले की, देशांतर्गत उत्पादनास चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया अभियानांतर्गत देशी-विदेशी गुंतवणुकीद्वारे औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मेक इन इंडिया वीक आयोजित करून राज्यात सुमारे आठ लक्ष कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. त्याचबरोबर नागपूर व अमरावती विभागात उत्पादन क्षेत्रातील ४,४०० कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. जे काम ६६ वर्षांत झाले नाही ते काम राज्य शासनाने गेल्या दीड वर्षांत केले आहे. राज्यात उद्योजकांनी चांगल्या पद्धतीने उद्योग केला पाहिजे यासाठी उद्योजक व कामगार यांनी एकमेकांच्या हिताची जोपासना करून आपल्या राज्याचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उद्योग सहसंचालक अ.प्र. धर्माधिकारी, अनिता मेश्राम, मुख्य अभियंता एस.आर. वाघ, प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, अतिरिक्त कामगार आयुक्त आर.एस. जाधव, अतिरिक्त संचालक जे.एम. मोटघरे, सहसंचालक एन.एस. अधारी, उपनियंत्रक रामअनुज, नासुप्रचे मुख्य अभियंता एस.एच. गुज्जेलवार, महावितरणचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.(प्रतिनिधी)

अमरावती एमआयडीसीला उद्योगाचे मॉडेल बनवणार
अमरावती एमआयडीसी हे राज्यात उद्योगाचे मॉडेल बनावे, यासाठी आपला प्रयत्न आहे. यासाठी मोठमोठे उद्योग आणण्यासाठी उद्योजकांचे मत परिवर्तन करून त्यांना कुशल कामगारवर्ग उपलब्ध करून देऊ, असेही उद्योग राज्यमंत्री पोटे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Efforts for the growth of employment opportunities for employment opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.