पैसे कमविण्याचा मार्ग ठरत आहे ‘एग डोनेशन’

By Admin | Published: February 20, 2016 03:33 AM2016-02-20T03:33:41+5:302016-02-20T03:33:41+5:30

स्त्री-पुरु षांच्या संबंधाशिवाय मूल जन्माला येणे ही बाब अशक्य वाटत असली तरी ते शक्य झाले आहे.

'Egg Donation' is the way to make money | पैसे कमविण्याचा मार्ग ठरत आहे ‘एग डोनेशन’

पैसे कमविण्याचा मार्ग ठरत आहे ‘एग डोनेशन’

googlenewsNext

सरोगसीपेक्षा सोपे तंत्रज्ञान :
महिलांकडून इस्पितळांमध्ये होत आहे विचारणा

नागपूर : स्त्री-पुरु षांच्या संबंधाशिवाय मूल जन्माला येणे ही बाब अशक्य वाटत असली तरी ते शक्य झाले आहे. ‘स्पर्म डोनर’सोबतच आता ‘एग डोनर’च्या माध्यमातून गर्भधारणा करणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरत आहे. विशेष म्हणजे, सरोगसीपेक्षा सोपा आणि लवकर पैसे मिळवण्याचा हा मार्ग म्हणून याकडे पाहिले जात असल्याने नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील महिला ‘एग डोनेशन’कडे वळत असल्याचे चित्र आहे.
बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे वंधत्वाचे (इन्फर्टिलिटी) प्रमाण वाढत चालले आहे. भारतामध्ये १८ ते ३५ वयोगटातील १० टक्के दाम्पत्यामध्ये वंध्यत्व आढळते. ताणतणाव, लठ्ठपणा, शहरी जीवनपद्धती, व्यसनाधिनता, व्यावसायिक बंधने यामुळे वंध्यत्व दिसते. मुले होत नाहीत, म्हणून बऱ्याचदा स्त्रीला दोषी ठरवले जाते. पण योग्य समुदपदेशन व तंत्रज्ञानामुळे याचा फायदा दाम्पत्याला होत असल्याचे दिसून येत आहे. यात ‘एग डोनर’ची मागणीसुद्धा वाढत चालली आहे. या प्रक्रि येला किमान पंधरा दिवस लागतात. रोज एक इंजेक्शन दिले जाते. त्यासाठी प्रति दिवस ठरलेली रक्कम देऊ केली जाते, सरोगसीपेक्षा हा सोपा मार्ग असल्याने अनेक महिलांकडून संबंधित इस्पितळांमध्ये विचारणा होत आहे. (प्रतिनिधी)

काय आहे ‘एग डोनेशन प्रोग्राम’
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी सांगितले, स्त्रीबीज दान करणाऱ्या महिलेला संपूर्ण ‘एग डोनेशन प्रोग्राम’ची माहिती दिली जाते. पहिल्या टप्प्यात तिची रक्ताची चाचणी आणि सोनोग्राफी केली जाते. त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट करून तिला कोणताही आजार नसल्याची खात्री करवून घेतली जाते. या प्रकियेत मासिकपाळी येण्यापूर्वी स्त्रीबीजाची संख्या वाढविणारे हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जातात. त्यानंतर पुढील महिन्यात येणाऱ्या मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी स्त्री बीज काढून टाकण्यात येते. याला किमान पंधरा दिवस लागतात.
स्त्री-बीज देणे गुन्हा नाही
नियमानुसार स्त्री-बीज देणे हा गुन्हा नाही. मात्र, ते कुणी द्यायला हवे याचे काही नियम आहेत. वर्षातून कमीत कमी तीन वेळा स्त्री-बीज देता येते. २१ ते ३५ वयोगटातील स्त्री, विवाहित महिला स्त्रीबीज दान करू शकते. तिला स्वत:चं एक मूल असणं गरजेचं आहे. ती शिकलेली असावी , तिचा रंग आणि चेहरा चांगला असावा , उच्चार स्पष्ट असावेत आणि व्यंग नसलेली कोणतीही स्त्री ‘एग डोनेट’ करू शकते.

Web Title: 'Egg Donation' is the way to make money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.