नागपुरात उत्साह पण साधेपणाने साजरी झाली ईद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 12:08 AM2020-08-02T00:08:02+5:302020-08-02T00:09:32+5:30
शहरात ईद-उल-अजहा उत्साहाबरोबरच साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करून सुरक्षित अंतर पाळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात ईद-उल-अजहा उत्साहाबरोबरच साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करून सुरक्षित अंतर पाळले. ईद नमाज पठण केल्यानंतर देशाची सुरक्षा व शांततेसाठी दुआ करण्यात आली. विशेष म्हणजे कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मुस्लिम धर्मगुरूंनी घरातच नमाज पठण करण्याचे आवाहन केले होते.
ईदनिमित्त गरजवंतांना मदत करण्यात आली. सोशल मीडियावर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. राजकीय व सामाजिक संघटनांनीसुद्धा सोशल मीडियावर ईदच्या शुभेच्छा शेअर केल्या. ईदनिमित्त घरोघरी शीरखुरमा बनविण्यात आला.
दिवंगतांना घरात राहूनच केली दुआ
ईद-उल-अजहाच्या पर्वावर मुस्लिम बांधव नमाज पठणानंतर कब्रस्तानात जाऊन दिवंगतांसाठी दुआ मागतात. त्यांच्या कबरीवर फातेहा पठण करतात. परंतु यंदा कोरोनामुळे दिवंगतांसाठी घरातूनच दुवा करण्यात आली.