नागपुरात साडेआठ हजारांवर झाडांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 09:59 PM2019-06-11T21:59:01+5:302019-06-11T21:59:53+5:30

शहरात सिमेंट रस्त्यांची कामे करताना कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे दहा हजारांहून अधिक झाडांच्या बुध्याजवळ कांक्रिटीकरण वा गट्टू लावण्यात आले होते. यामुळे झाडांना धोका निर्माण झाला होता. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी बुंधे मोकळे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ८६९७ झाडांचे बुंधे मोकळे केले आहेत. शिल्लक असलेल्या हजाराहून अधिक झाडांचे बुंधे आठवडाभरात मोगळे केले जाणार आहेत.

Eight and a half thousand plants in Nagpur breathed freely | नागपुरात साडेआठ हजारांवर झाडांनी घेतला मोकळा श्वास

नागपुरात साडेआठ हजारांवर झाडांनी घेतला मोकळा श्वास

googlenewsNext
ठळक मुद्देआठवडाभरात सर्व झाडांचे बुंधे मोकळे करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सिमेंट रस्त्यांची कामे करताना कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे दहा हजारांहून अधिक झाडांच्या बुध्याजवळ कांक्रिटीकरण वा गट्टू लावण्यात आले होते. यामुळे झाडांना धोका निर्माण झाला होता. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी बुंधे मोकळे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ८६९७ झाडांचे बुंधे मोकळे केले आहेत. शिल्लक असलेल्या हजाराहून अधिक झाडांचे बुंधे आठवडाभरात मोगळे केले जाणार आहेत.
सिमेंट रस्त्यांच्या विळख्यातून बुंधे मोकळे व्हावे यासाठी आयुक्तांनी वेळोवेळी आढावा घेतला. २८ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी दोन आठवड्यात शिल्लक ३७१८ झाडांची बुंधे मोकळे करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एका आठवड्यात १९४३ झाडांचे बुंधे मोकळे करण्यात आले. १७७५ झाडे बुंधे मुक्त करण्याचे शिल्लक आहे. यापैकी सुमारे ७५० झाडे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील आहेत. वर्धा मार्ग, अमरावती मार्ग व छिंदवाडा मार्गावरील ही झाडे आहेत. या झाडांचे बुंधे मोकळे करण्यासंदर्भात संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. मनपाच्या अखत्यारितील शिल्लक झाडे आठवडाभरात सिमेंट रस्त्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यात येतील, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
सिमेंट रस्त्यांच्या बांधकामात शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आल्याची बाब लक्षात येताच अभिजित बांगर यांनी उद्यान विभागाला झाडांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले. यात शहरातील २५२३७ झाडांपैकी १४७६५ झाडे सुरक्षित आढळली. मात्र १०४७२ झाडांच्या अस्तित्वाला धोका असल्याचे दिसून आले. या झाडांचे बुंधे लवकरात लवकर मोकळे करण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या मार्गदर्शनात सुरू असलेली ही मोहीम अंतिम टप्प्यात असून शहरातील सर्व झाडे लवकच मोकळा श्वास घेणार आहेत.

Web Title: Eight and a half thousand plants in Nagpur breathed freely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.