ऑक्सिजनचे ८ रिकामे टँकर गेले अंगुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:08 AM2021-05-18T04:08:25+5:302021-05-18T04:08:25+5:30

नागपूर : पहिल्यांदा ऑक्सिजन एक्स्प्रेसने ८ रिकामे ऑक्सिजनचे टँकर अंगुलसाठी रवाना करण्यात आले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ७ ऑक्सिजन ...

Eight empty oxygen tankers went to Angul | ऑक्सिजनचे ८ रिकामे टँकर गेले अंगुलला

ऑक्सिजनचे ८ रिकामे टँकर गेले अंगुलला

Next

नागपूर : पहिल्यांदा ऑक्सिजन एक्स्प्रेसने ८ रिकामे ऑक्सिजनचे टँकर अंगुलसाठी रवाना करण्यात आले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ७ ऑक्सिजन टँकर घेऊन पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस २३ एप्रिलला विशाखापट्टनम येथून नागपुरात पोहोचली होती. यातील ७ टँकरपैकी ३ टँकर नागपुरात उतरविण्यात आले तर ४ टँकर नाशिकला पाठविण्यात आले होते. त्यानंतर ८ मे, ९ मे, १३ मे, १४ मे आणि १५ मे रोजी ४ टँकर घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात पोहोचल्या होत्या. एकूण ४ टँकर घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस १२ मे रोजी नागपुरात आली होती. परंतु, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार हे टँकर पुण्याला पाठविण्यात आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या नेतृत्वात नागपूर विभागाने पहिल्यांदा ८ रिकामे टँकर १७ मे रोजी रात्री १२.३० वाजता ऑक्सिजन एक्स्प्रेसने रिफिलींगसाठी ओडिशातील अंगुल येथे पाठविले.

.........

Web Title: Eight empty oxygen tankers went to Angul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.