नागपुरात  आठ विमाने उशिरा पोहोचली, चक्रीवादळामुळे कोलकाताची उड्डाणे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:36 AM2019-11-10T00:36:07+5:302019-11-10T00:38:09+5:30

. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठ विमाने उशिरा पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.

Eight flights arrive late in Nagpur, canceling Kolkata flights due to Hurricane | नागपुरात  आठ विमाने उशिरा पोहोचली, चक्रीवादळामुळे कोलकाताची उड्डाणे रद्द

नागपुरात  आठ विमाने उशिरा पोहोचली, चक्रीवादळामुळे कोलकाताची उड्डाणे रद्द

googlenewsNext
ठळक मुद्देगो एअरच्या विमानाला तीन तास विलंब

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : देशाच्या अन्य शहरांमधून नागपुरात विविध कंपन्यांच्या विमानांच्या लेटलतिफीचा क्रम सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत धुके असल्याने अनेक विमाने नागपुरात उशिरा आली होती. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठ विमाने उशिरा पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.
याशिवाय बंगालच्या उपमहासागरात ‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरील सर्व विमानांचे उड्डाण शनिवारी सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत रद्द करण्यात आले आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसला. नागपुरातून कोलकाताला जाणारे इंडिगोचे विमान आणि कोलकाताहून नागपुरात येणारी दोन विमाने रद्द करण्यात आली आहेत.
गो एअरचे जी८२८३ पुणे-नागपूर विमान सकाळी ८.५५ ऐवजी तब्बल ३ तास उशिरा ११.५५ वाजता आणि एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई- नागपूर विमान रात्री ८.३५ मिनिटांऐवजी दोन तास उशिरा पोहोचले. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. एअर इंडियाच्या काऊंटरवर विचारपूस केली असता, काहीही उत्तर मिळाले नाही.
इंडिगोच्या ६ई५६३ चेन्नई-नागपूर विमान १ तास ५ मिनिटे उशिरा दुपारी १ ऐवजी २.०५ वाजता, इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान ३५ मिनिटे विलंबाने दुपारी १.४० वाजता, इंडिगोचेच ६ई४०३ मुंबई-नागपूर विमान ३३ मिनिटे उशिरा सायंकाळी ६.०३ वाजता, गो एअरचे दिल्ली-नागपूर विमान ३२ मिनिटे विलंबाने रात्री ९.२७ वाजता, इंडिगोचे ६ई५३७७ मुंबई-नागपूर विमान ३० मिनिटे उशिराने रात्री १०.१५ वाजता आणि गो एअरचे जी८ ७१२ बेंगळुरू-नागपूर विमान ३० मिनिटे उशिरा मध्यरात्रीनंतर आले. याशिवाय गो एअरचे जी८१४१ नागपूर-मुंबई विमान दुपारी ३ तास उशिरा विलंबाने मुंबईला पोहोचल्याची माहिती आहे.

Web Title: Eight flights arrive late in Nagpur, canceling Kolkata flights due to Hurricane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.