आठ लाख मागासवर्गीय कर्मचारी कामावर उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:03 AM2018-08-09T00:03:18+5:302018-08-09T00:04:14+5:30
महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ७ आॅगस्टपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये मागासवर्गीयांच्या चार प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीत. राज्यातील आठ लाख मागासवर्गीय कर्मचारी कामावर उपस्थित आहेत, असा दावा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ७ आॅगस्टपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये मागासवर्गीयांच्या चार प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीत. राज्यातील आठ लाख मागासवर्गीय कर्मचारी कामावर उपस्थित आहेत, असा दावा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केला आहे.
महाराष्ट्रात मागासवर्गीयांचा २,३९,००० चा अनुशेष असून गेल्या चार वर्षात नोकरभरतीच सरकारने केली नाही. तेव्हा मागासवर्गीयांचा अनुशेष भरणे, पदोन्नतीमधील अनुशेष भरणे, महत्त्वाच्या जागी मागासवर्गीयांच्या नेमणुका करणे, वारंवार मागासवर्गीयांच्या बदल्या थांबविणे या चार मागण्यांचा समावेश नसल्याने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ संपात सहभागी झाला नाही. आठ लाख मागासवर्गीय कर्मचारी संपात सहभागी नसल्याने संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा फोल ठरला आहे. ४० टक्के कर्मचारी कामावर आहेत. ९ आॅगस्ट रोजीसुद्धा मागासवर्गीय कर्मचारी कामावर उपस्थित राहतील, असा दावाही कृष्णा इंगळे यांच्यासह नामदेवराव कांबळे, सत्यदेव रामटेके, गणेश मडावी यांनी केला आहे.