नागपूर ते हैदराबादपर्यंत होणार आठपदरी महामार्ग; नितीन गडकरींचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 06:53 AM2022-10-27T06:53:05+5:302022-10-27T06:53:29+5:30
नागपुरात महामार्गाचे जाळे तयार होत आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आहे. सध्या या प्रवासाला आठ ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे तासांपेक्षाही अधिक वेळ लागतो. लोकार्पण नोव्हेंबरमध्ये होत आहे.
नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग व नागपूर-गोवा महामार्गानंतर आता नागपूर हैदराबाद महामार्ग तयार होण्याची आशा बळावली आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी चर्चा करताना हा नवा महामार्ग साकार होण्याचे संकेत दिले. हा महामार्ग आठपदरी होईल. त्यामुळे नागपूर-हैदराबाद हे सुमारे साडेपाचशे किलोमीटरचे अंतर अवघ्या साडेतीन तासात पार करता येणार आहे. सध्या या प्रवासाला आठ तासांपेक्षाही अधिक वेळ लागतो
नागपुरात महामार्गाचे जाळे तयार होत आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आहे. सध्या या प्रवासाला आठ ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे तासांपेक्षाही अधिक वेळ लागतो. लोकार्पण नोव्हेंबरमध्ये होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते गोवा महामार्गाची घोषणा केली आहे. आता गडकरी यांनी नागपूर ते हैदराबाद महामार्गाचा प्रस्ताव ठेवला असून त्याचा डीपीआरसुद्धा तयार आहे. देशभरात रस्त्यांचे जाळे तयार करण्याचा संकल्प असून यात नागपूर हैदराबाद महामार्गाचाही समावेश आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर हा सुपरफास्ट महामार्ग असणार आहे.
पुण्यासाठी समृद्धी महामार्गाशी जुळणार स्वतंत्र मार्ग
नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी कुठलीही विशेष सुविधा नाही. १२ ते १५ तास लागतात. ही अडचण दूर करण्यासासाठी समृद्धी महामार्गाला लागून जालना ते नगर आणि पुण्याला जोडण्यासाठी एक नवीन मार्ग तयार करण्याची योजना आहे. यामुळे नागपूर ते पुणेपर्यंतचा प्रवास अधिक सुखकारक होईल.
महामार्गासाठी पुन्हा बॉण्ड
■ गडकरी यांनी पुढील वर्षी २५ हजार कोटी रुपयांचे रस्ते बनवण्याचा मानस व्यक्त केला.
■ महामार्ग विकासासाठी निधी प्राप्त करण्याच्या उद्देशाने बॉण्ड जारी करण्यात आले आहेत. आता पुन्हा बॉण्ड जारी करण्याची तयारी आहे. जेणेकरून नागरिकांकडून गुंतवणूक प्राप्त केली जाऊ शकेल.