Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात आठ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 11:55 PM2019-10-01T23:55:10+5:302019-10-01T23:57:42+5:30
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघातून ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर आजपर्यंत ६८० उमेदवारी अर्जाची उचल करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघातून ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर आजपर्यंत ६८० उमेदवारी अर्जाची उचल करण्यात आली आहे. विशेष २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली असून मंगळवारपर्यंत एकही अर्ज निवडणुक आयोगाकडे दाखल झाला नव्हता. मंगळवारी आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले.
यात हिंगणा विधानसभेसाठी दोन, उमरेड विधानसभेसाठी दोन, दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघासाठी एक, दक्षिण नागपूर एक, मध्य नागपूर एक आणि उत्तर नागपूरसाठी एक असे एकूण आठ नामांकन अर्ज दाखल झाले. हिंगणा विधानसभा मतदारसंघात माधुरी विजेंद्र राजपूत, सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) आणि माधव चंपतराव भोंडे, (अपक्ष) यांचा समावेश आहे. उमरेड विधानसभा मतदारसंघात पांडुरंग मोडकू शंभरकर, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया (एपीआय) तर्फे आणि विलास गणेश झोडापे (अपक्ष ) म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.
नागपूर दक्षिण -पश्चिम नागपूर मतदार संघातून योगेश कृष्णराव ठाकरे सीपीआय (एम) यांनी, दक्षिणमधून उदय रामभाऊजी बोरकर (बहुजन महापार्टी) यांनी, मध्य नागपूर मधून प्रफुल हेमराज बोकडे (अपक्ष) यांनी तर उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात कार्तिक गेंदलालजी डोके (विश्व हिंदू जनसत्ता पार्टी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. २ ऑक्टोबरची सुटी असल्याने ३ आणि ४ ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे.