मध्य प्रदेशातील आठ व्यक्तींना पेंच व्याघ्र प्रकल्पात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:11 AM2021-09-04T04:11:36+5:302021-09-04T04:11:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये अवैध प्रवेश करून वनौषधी गोळा करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला शुक्रवारी गस्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये अवैध प्रवेश करून वनौषधी गोळा करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला शुक्रवारी गस्ती पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पाच किलो औषधीसह चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
नागलवाडी (एकसंघ नियत्रण) वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७०३ मध्ये ही घटना घडली. नागलवाडी परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी गस्त करीत असताना प्रकल्पामध्ये हे व्यक्ती आढळून आले. त्यांना विचारणा केली असता, जडीबुटी गोळा करण्यासाठी आल्याचे सांगितले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकलाल चंपकलाल उईके, प्रताप जंगलू सरियाम, सुरेश रामप्रसाद रामटेके, जंगलू छोटे सय्याम, अशोक देवा दुर्वे, शेकू छोटेलाल तुमडाम, सनाजी निरली उईके, पिपरु बकारिया धुर्वे (सर्व जण मेलारी बाकुल, ता. मोखेड जिल्हा - छिंदवाडा, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम व वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वनरक्षक कुंभरे, इंगळे, कौरती, वनपाल माटे, वनपरिक्षेत्र आधिकारी विजय कदम यांनी पार पाडली.