मोबाइलच्या अतिवापराने आठ विद्यार्थ्यांना बहिरेपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 05:02 AM2020-01-05T05:02:29+5:302020-01-05T05:02:34+5:30
हल्ली मोबाईलचे वेड लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ््यांना लागले आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : हल्ली मोबाईलचे वेड लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ््यांना लागले आहे. मोबाईलचा हाच अतिवापर आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलच्या ‘ईएनटी’ विभागाने मोबाईलच्या वापरामुळे श्रवणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. एमबीबीएसच्या ६० विद्यार्थ्यांवर केलेल्या या अभ्यासात ८ विद्यार्थ्यांना आवाजामुळे बहिरेपणा आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, हे विद्यार्थी मोबाईलसाठी ज्या कानाचा वापर करायचे त्यालाच बहिरेपणा आला.
भारतात मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या सुमारे ७३ कोटींच्या घरात आहे. मोबाईलमधून उत्सर्जित होणारे ‘मायक्रोवेव्ह’ हे आरोग्यासाठी किती घातक आहेत, यावर अद्यापही संशोधन सुरू आहे. मात्र, मोबाईलच्या अतिवापराचा परिणाम श्रवणावर होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स अॅण्ड लता मंगेशकर हॉस्पिटलच्या कान, नाक व घसा विभागाच्यावतीने (ईएनटी) विभागप्रमुख डॉ. नितीन देवस्थळे यांनी महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मदतीने मोबाईलच्या वापराने श्रवणावर होणारा परिणाम यावर अभ्यास केला. यात मोबाईलच्या अतिवापराने बहिरेपणा येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
डॉ. देवस्थळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ६० विद्यार्थ्यांचे शून्य
ते एक तास, एक ते दोन तास,
दोन ते तीन तास व त्यापेक्षा जास्त तास मोबाईलवर बोलणाºया विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करण्यात
आले. या सर्वच विद्यार्थ्यांची ‘आॅडिओमेट्री’ म्हणजे कानाची तपासणी करण्यात आली.
>जे विद्यार्थी तीन तासांच्या वर सतत मोबाईलवर बोलायचे अशा आठ विद्यार्थ्यांमध्ये बहिरेपणा आढळून आला. मोबाइलवर बोलताना ज्या कानाचा वापर सर्वाधिक झाला, तो बहिरा झाला. हा अभ्यास पॅनाशिआ इंडेक्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला