अकरावीच्या प्रवेशासाठी आठ हजारांवर विद्यार्थ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:11 AM2021-08-18T04:11:10+5:302021-08-18T04:11:10+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी रद्द करून सहा आठवड्यांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी रद्द करून सहा आठवड्यांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले. त्यानुसार शिक्षण संचालनालयाने केंद्रीय प्रवेश समितींना निर्देश दिले आहे. केंद्रीय प्रवेश समितीने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार १४ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात केली आहे. अद्यापपर्यंत ८३५९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.
नागपूर महापालिकेच्या हद्दीतील ज्युनि. कॉलेजमध्ये ५९,२५० अकरावीच्या जागा आहेत. यात सर्वाधिक जागा विज्ञान शाखेच्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. २३ ऑगस्टला प्रोव्हिजनल जनरल मेरीट लिस्ट प्रसिद्ध होणार आहे. २७ ऑगस्ट रोजी पहिल्या फेरीची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. ३० ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करायचे आहे व ज्युनि. कॉलेजला रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करायची आहे. ३१ ऑगस्ट रोजी दुसरी फेरी व ५ सप्टेंबरला तिसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध होणार आहे.
- दृष्टिक्षेपात
आतापर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी - ८३५९
भाग एक भरलेले विद्यार्थी - ४२२४
ऑप्शन भरलेले विद्यार्थी - २२०८
- अकरावीच्या जागा
शहरातील अकरावीच्या एकूण जागा - ५९२५०
विज्ञान शाखेतील जागा - २७४६०
वाणिज्य शाखेतील जागा - १८०००
कला शाखेतील जागा - ९६६०
एमसीव्हीसी जागा - ४१३०