आठ वर्षीय मुलीचा विनयभंग, घरी नेऊन केले अश्लील वर्तन; आरोपीस अटक
By दयानंद पाईकराव | Updated: October 21, 2023 17:09 IST2023-10-21T17:08:46+5:302023-10-21T17:09:26+5:30
पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

आठ वर्षीय मुलीचा विनयभंग, घरी नेऊन केले अश्लील वर्तन; आरोपीस अटक
नागपूर : आठ वर्षाच्या मुलीला आपल्या घरी नेऊन तिच्याशी अश्लील वर्तन करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करणाऱ्या आरोपीला सक्करदरा पोलिसांनी गजाआड केले आहे.
शेख मुस्ताक उर्फ राजु शेख रशीद (वय २७, रा. सक्करदरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी १९ ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता ३३ वर्षीय फिर्यादी महिलेची आठ वर्षांची मुलगी घराजवळ खेळत होती. आरोपी शेख मुस्ताक मुलीजवळ आला. त्याने मुलीला आपल्या सोबत घरी नेले. तेथे त्याने तिच्याशी अश्लील वर्तन करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.
घरी आल्यानंतर मुलीने आपल्या आईला आरोपीच्या कृत्याबाबत माहिती दिली. या प्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४ (अ), सहकलम ८, १२ पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सक्करदरा पोलिस करीत आहेत.