'एक विलेन'ने नागपूरकरांना क्रेझी केले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 10:35 PM2022-07-16T22:35:54+5:302022-07-16T22:37:08+5:30
Nagpur News ‘एक विलेन रिटर्न्स’चे कलावंत अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांनी शनिवारी लाेकमत कार्यालयाला भेट दिली.
नागपूरः ‘एक विलेन रिटर्न्स’चे कलावंत अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांनी शनिवारी लाेकमत कार्यालयाला भेट दिली. लाेकमतच्या संपादकीय सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. दाेन्ही कलावंतांनी त्यावर दिलखुलास उत्तरे दिली.
काेराेना काळातील दाेन वर्षे कठीण गेल्याचे अर्जुन म्हणाला. लूक आवश्यक आहे, पण अभिनय त्यापेक्षा गरजेचा आहे. पात्राच्या गरजेनुसार लूक बदलणे गरजेचे असते. दाक्षिणात्य चित्रपट इकडे प्रदर्शनासाठी हिंदी भाषेत डब करावे लागतात. काही माेजके चित्रपट चालले म्हणून लाेक त्या भाषेत चित्रपट पाहत नाहीत. आपल्या प्रेक्षकांची आवड समजण्याचा बाॅलिवूडने कायम प्रयत्न केला आहे. काेराेनाच्या दाेन वर्षात थाेडे बदल झाले. महाराष्ट्रासह उत्तरेकडचे प्रेक्षक आणि दक्षिणेकडचे प्रेक्षक वेगळे आहेत. आम्हाला बाैद्धिक चित्रपटांसह सामान्य प्रेक्षकांची आवड जपावी लागेल. चांगले चित्रपट काेणत्याही भाषेचे असाे ते चालतात, असे स्पष्ट मत अर्जुनने व्यक्त केले.
स्टारडम जाण्याची भीती नाही, असेही ताे म्हणाला. गेल्या काही वर्षात नकारात्मक (विलेनसारख्या) गाेष्टींचा प्रभाव वाढत असल्याचेही ताे म्हणाला. गायिका म्हणून डेब्यू करणारी तारा सुतारिया हिनेही आपल्या पात्राविषयी सांगितले. नेपाेटिझमची जाणीव झाली नसल्याचे तिने स्पष्ट केले. तत्पूर्वी लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग यांनी कलावंतांचे स्वागत केले.