धापेवाड्याची एकादशी व आषाढी यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:26+5:302021-07-14T04:11:26+5:30

धापेवाडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथील देवशयनी एकादशी व आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे. २० जुलैला ...

Ekadashi and Ashadi Yatra of Dhapewada canceled | धापेवाड्याची एकादशी व आषाढी यात्रा रद्द

धापेवाड्याची एकादशी व आषाढी यात्रा रद्द

Next

धापेवाडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथील देवशयनी एकादशी व आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे. २० जुलैला होणारी आषाढी एकादशी यात्रा व २५ जुलैला होणारी आषाढी प्रतिपदा यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे सचिव आदित्यप्रतापसिंह पवार यांनी दिली. तसेच विठुरायाच्या पूजेव्यतिरिक्त इतर परिपाठचे कार्यक्रम पूर्णपणे स्थगित करण्यात आले आहेत.

आषाढी एकादशीला व आषाढी प्रतिपदेला पंढरपूरचा पांडुरंग धापेवाड्यात अवतरतो अशी आख्यायिका आहे. त्यामुळे येथे एकादशीला मोठी यात्रा भरते. धापेवाड्यातील संत कोलबास्वामी मठ, वारामाय मठ, रघुसंत महाराज व मकरंदपुरी महाराज मठातील दिंड्या सायंकाळी नगरभ्रमण करतात. दूरवरून मोठ्या संख्येत दिंड्या व भाविक येथे येतात. मात्र यंदाही यात्रा स्थगित झाल्याने भाविकांना घरी बसूनच विठुरायाची पूजा करावी लागणार आहे.

Web Title: Ekadashi and Ashadi Yatra of Dhapewada canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.