समाजकंटकांनी जाळली वृद्ध दाम्पत्याची ‘रोजी रोटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:46+5:302021-07-19T04:07:46+5:30

जिजामातानगरात राहणारे वृद्ध तायडे दाम्पत्य सकाळपासून रात्रीपर्यंत चहा- नाश्त्याची टपरी चालवून आपल्या दोन वेळेच्या भाजीभाकरीची सोय करीत होते. नेहमीप्रमाणे ...

Elderly couple's 'bread' burnt by rioters | समाजकंटकांनी जाळली वृद्ध दाम्पत्याची ‘रोजी रोटी’

समाजकंटकांनी जाळली वृद्ध दाम्पत्याची ‘रोजी रोटी’

Next

जिजामातानगरात राहणारे वृद्ध तायडे दाम्पत्य सकाळपासून रात्रीपर्यंत चहा- नाश्त्याची टपरी चालवून आपल्या दोन वेळेच्या भाजीभाकरीची सोय करीत होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ते चहाची टपरी सुरू करण्यासाठी आले असता ती आगीत खाक झाल्याचे चित्र दिसले. बास, बल्ली, बोरे अन् लाकडी टेबलवजा टपरी पुरती जळून गेली होती. त्यामुळे तायडे दाम्पत्याचे अवसानच गळाले. जगण्याचे साधन अन् रोजीरोटीचा आसरा असलेली टपरी जळाल्याने आता कसे जगायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांना ही माहिती कळताच ते मोठ्या संख्येत गोळा झाले. त्यांनी वृद्ध दाम्पत्याच्या टपरीची जाळपोळ करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. तणाव वाढत असल्याची माहिती कळताच वाठोडा पोलीस घटनास्थळी पोहचले. रात्रीपर्यंत या प्रकरणा समाजकंटकाला अटक झाली नव्हती.

---

Web Title: Elderly couple's 'bread' burnt by rioters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.