भरधाव ट्रकने तिघींना उडवले; वृद्ध महिलेचा मृत्यू, दोघी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 06:30 PM2022-06-23T18:30:15+5:302022-06-23T18:35:56+5:30
तिघीही राेडलगत असलेल्या एका हाॅटेलसमाेर बसून वाहनाची प्रतीक्षा करीत हाेत्या. दरम्यान, वेगात आलेल्या ट्रकने त्या तिघींनाही जाेरात धडक दिली आणि ट्रक निघून गेला.
कुही (नागपूर) : वेगात जाणाऱ्या ट्रकने राेडलगत वाहनाची प्रतीक्षा करीत बसलेल्या तिघींना जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने वृद्ध महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य दाेघी जखमी झाल्या. ही घटना वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अंभाेरा येथे नुकतीच घडली.
बयनाबाई उर्फ लहानाबाई हरिश्चंद्र पडाेळे (७०, रा. गाेन्हा, ता. कुही) असे मृत महिलेचे नाव असून, शारदा अशाेक पडाेळे (रा. गाेन्हा, ता. कुही) व काैसल्या नारायण कुंभलकर (रा. चापेगडी, ता. कुही) अशी जखमींची नावे आहेत. शारदा व काैसल्या या बयनाबाईच्या नातेवाईक हाेत. तिघीही अंभाेरा, ता. कुही येथील राेडलगत असलेल्या एका हाॅटेलसमाेर बसून वाहनाची प्रतीक्षा करीत हाेत्या. दरम्यान, वेगात आलेल्या ट्रकने त्या तिघींनाही जाेरात धडक दिली आणि ट्रक निघून गेला. यात बयनाबाई यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर शारदा व काैसल्या जखमी झाल्या.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून बयनाबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर शारदा व काैसल्या यांना उपचारासाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. याप्रकरणी कुही पाेलिसांनी मृत बयनाबाई यांचा मुलगा श्रीकृष्ण हरिश्चंद्र पडाेळे (४८, रा. गाेन्हा, ता. कुही) यांच्या तक्रारीवरून ट्रकचालक राजू दयाराम बाळबुधे (४०, रा. गाेन्हा, ता. कुही) याच्या विराेधात गुन्हा दाखल करून त्याचा शाेध सुरू केला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार आनंद कविराज करीत आहेत.