निवडणूक आयोगाने घेतली ऑनलाईन तक्रारीची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:21 PM2019-09-25T12:21:00+5:302019-09-25T12:22:46+5:30

भूमिपूजन कार्यक्रमाचा नारळ फुटताच काही दिवसातच आचारसंहिता लागू झाली. अशातच संबंधित विभागाने सदर फलक झाकले नाही. यामुळे सोनपुरी येथील राहुल तागडे या तरुणाने ऑनलाईन तक्रार केली. त्या तरुणाच्या तक्रारीची तडकाफडकी दखल घेतली गेली.

Election Commission look after on online complaint | निवडणूक आयोगाने घेतली ऑनलाईन तक्रारीची दखल

निवडणूक आयोगाने घेतली ऑनलाईन तक्रारीची दखल

googlenewsNext
ठळक मुद्देआचारसंहिता लागल्यानंतरही फलक उघडाच उमरेड तालुक्यातील सोनपुरी येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भूमिपूजन कार्यक्रमाचा नारळ फुटताच काही दिवसातच आचारसंहिता लागू झाली. अशातच संबंधित विभागाने सदर फलक झाकले नाही. यामुळे सोनपुरी येथील राहुल तागडे या तरुणाने ऑनलाईन तक्रार केली. त्या तरुणाच्या तक्रारीची तडकाफडकी दखल घेतली गेली.
उमरेड तालुक्यातील निरव्हा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सोनपुरी येथील भूमिपूजन तीन लोखंडी फलक झाकल्या गेले नव्हते. यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची बाब लक्षात येताच डिजिटल पद्धतीचा अवलंब करीत राहुल तागडे याने सीव्हीजील अ‍ॅपवर याप्रकरणी तक्रार नोंदविली. सोमवारी तक्रार करताच निवडणूक आयोगामार्फत याची दखल घेण्यात आली. अवघ्या दोन तासातच संबंधित यंत्रणा जागी झाली. तीन फलकांपैकी दोन उखडल्या गेले. तिसरा फलक झाकल्या गेला. आयोगाच्या सीव्हीजील अ‍ॅपमुळे तडकाफडकी कारवाई झाल्याने राहुल तागडे यांनी समाधान व्यक्त केले.
याबाबत उपविभागीय कार्यालयात विचारणा केली असता, आचारसंहिता लागू झाल्यानंतर फ्लॅक्स, फलक झाकायला अथवा काढायला पाहिजे. नगर पालिका, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, नगरपंचायत आदी वेगवेगळ्या यंत्रणेने याबाबतची दखल घ्यावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीबाबत सीव्हीजील अ‍ॅपवर तक्रार करता येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी एच. व्ही. झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

Web Title: Election Commission look after on online complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.