महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार कौन्सिलची निवडणूक अवैधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:05 AM2018-04-16T11:05:26+5:302018-04-16T11:05:35+5:30

कायद्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांची सामूहिक फोटोग्राफी झाली हा ‘लोकमत’चा दावा खरा ठरला आहे.

The election of the Maharashtra and Goa Bar Council is illegal | महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार कौन्सिलची निवडणूक अवैधच

महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार कौन्सिलची निवडणूक अवैधच

Next
ठळक मुद्देमतपत्रिकांची फोटोग्राफी ‘लोकमत’कडे आणखी दोन फोटो

राकेश घानोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कायद्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांची सामूहिक फोटोग्राफी झाली हा ‘लोकमत’चा दावा खरा ठरला आहे. ‘लोकमत’च्या हातात मतपत्रिकांचे आणखी दोन फोटो लागले आहेत. त्या फोटोंवरून मतदारांनी कुणाला पहिल्या पसंतीचे मत दिले हे स्पष्ट दिसून येत आहे. कौन्सिलच्या २५ जागांसाठी गेल्या २८ मार्च रोजी निवडणूक झाली. मतदार वकिलांना मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास सक्तमनाई करण्यात आली होती. वकिलांना मतदान कक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडील मोबाईल निवडणूक कर्मचाऱ्यांकडे जमा करायचे होते. तशी सूचना प्रवेशद्वारावर लावण्यात आली होती. तसेच, आचार संहितेमध्येही ही बाब नमूद करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी वकील व निवडणूक कर्मचाऱ्यांनी या नियमाला केराची टोपली दाखविली. नागपूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ आणि जिल्हा व सत्र न्यायालयात मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी वकिलांनी मोबाईल सोबत नेऊन मतदान केले. त्यांनी कौन्सिलचे निर्देश पाळले नाहीच, पण निवडणूक कर्मचाऱ्यांनीही त्यांना मोबाईल जमा करण्यास सांगण्याची तसदी घेतली नाही. न्यायदान व्यवस्थेत रोज कार्य करणाऱ्या या दोन्ही घटकांनी नियमाची पायमल्ली केली. काही वकिलांनी त्याही पुढे जाऊन पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकांचे मोबाईलने फोटो काढले. कायद्यानुसार ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेणे बंधनकारक होते. परंतु, मतपत्रिकांच्या फोटोग्राफीमुळे या तरतुदीचे उल्लंघन झाले. ही निवडणूक केवळ नावापुरतीच गुप्त ठरली.

Web Title: The election of the Maharashtra and Goa Bar Council is illegal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.