Nagpur ZP : नागपूर जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात? आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 10:25 AM2022-10-17T10:25:48+5:302022-10-17T10:40:01+5:30

विशेष सभेतून अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार आहे.

Election of Nagpur ZP President, Vice President, who will win | Nagpur ZP : नागपूर जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात? आज फैसला

Nagpur ZP : नागपूर जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात? आज फैसला

googlenewsNext

नागपूर :जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, आता आगामी सव्वादोन वर्षांसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सोमवार १७ ऑक्टोबर रोजी विशेष सभेतून अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार आहे. यासाठी दुपारी ३ वाजता जि. प.च्या आबासाहेब खेडकर सभागृहात नागपूर शहर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी नामनिर्देशनपत्र वाटप व स्वीकारण्याची प्रक्रिया सोमवारी सकाळी ११ ते १ यावेळेत राहील. विशेष सभेला सुरुवात दुपारी ३ वाजता सुरुवात होईल. प्राप्त झालेल्या नामनिर्देशनपत्राची छाननी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांपासून ते ३.१५ वाजतापर्यंत राहील. नामनिर्देशपत्र परत घेण्याची वेळ दुपारी ३़.१५ ते ३.३० वाजेपर्यंत राहील. तसेच आवश्यक असल्यास मतदानाची वेळ दुपारी ३.४५ वाजतापासून राहील.

कवरे, मानकर काँग्रेसच्या खेम्यात परतले

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये फूट पडली होती. नाना कंभाले यांनी बंड पुकारून काँग्रेसचे सदस्य प्रीतम कवरे व मेघा मानकर आपल्या सोबत असल्याचा दावा केला होता. शनिवारपर्यंत नॉट रिचेबल असलेले कवरे व मानकर रविवारी काँग्रेसच्या खेम्यात परतल्याचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सांगितले. सध्या काँग्रेसचे ३१ व एक काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार असे ३२ सदस्य काँग्रेसकडे असल्याचे ते म्हणाले. पण नाना कंभाले यांनी अजूनही बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे.

नाना कंभाले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार उभे करणार असा इशारा दिला होता. कवरे यांचा अध्यक्षासाठी अर्ज भरण्यात येईल. तसेच मेघा मानकर या आपल्यासोबत असल्याचेही ते बोलले होते; पण सध्या ते एकटे पडले आहेत. त्यामुळे सोमवारी काँग्रेसकडून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी एकाच उमेदवाराचा अर्ज दाखल होणार आहे.

सध्या काँग्रेसचे ३२ सदस्य कळमेश्वर येथील अंबिका फार्महाऊसवर आहेत. त्यांच्यासोबत शेकापचा एक सदस्य व राष्ट्रवादीचे दोन सदस्य आहेत. सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी हा सर्व ताफा अंबिका फार्मवरून थेट जिल्हा परिषदेमध्येच उतरणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. अद्यापही काँग्रेसचा अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार निश्चित झालेला नसल्याचे कुंभारे यांनी सांगितले.

Web Title: Election of Nagpur ZP President, Vice President, who will win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.