मतमोजणी सुरू; गाणारांची हॅट्ट्रिक की परिवर्तन, गुरुजींचा कौल कुणाला ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 10:27 AM2023-02-02T10:27:51+5:302023-02-02T10:42:28+5:30

२८ टेबलवर मतमोजणी : पहिल्या पसंतीवर सायंकाळी ६ पर्यंत निकाल, दुसऱ्या पसंतीवर गेल्यास रात्री १२ चा ठोका

Election Of Teachers Constituency Result Nagpur, Nago Ganar Sudhakar Adbale Rajendra Zade who will win | मतमोजणी सुरू; गाणारांची हॅट्ट्रिक की परिवर्तन, गुरुजींचा कौल कुणाला ?

मतमोजणी सुरू; गाणारांची हॅट्ट्रिक की परिवर्तन, गुरुजींचा कौल कुणाला ?

googlenewsNext

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली आहे. २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतमोजणीपूर्वी प्रमुख उमेदवार व नेत्यांनी विजयाबद्दल दावे केले आहेत. भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विजयाची हॅट्ट्रिक मारतात की सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे परिवर्तन घडवतात, याकडे शिक्षकांसह राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले आहे.

सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान झाले. ३९ हजार ८३४ पैकी ३४ हजार ३५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अजनी येथील समुदाय भवनात सकाळी ७:३० वाजता मतपेट्या बंद केलेली स्ट्राँगरूम उघडण्यात आला. प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी मतमोजणी केंद्रावर उपस्थित मतमोजणी अधिकारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आदींना गोपनीयतेची शपथ देण्यात आली.

मतमोजणी अशाप्रकारे

- एकूण २८ टेबलवर मतमोजणी.

- प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणीस सुरुवात

- उमेदवार व प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची परवानगी 

- मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येईल. उमेदवार घोषित होऊन त्यास निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

Web Title: Election Of Teachers Constituency Result Nagpur, Nago Ganar Sudhakar Adbale Rajendra Zade who will win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.