संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू

By admin | Published: January 11, 2015 12:44 AM2015-01-11T00:44:53+5:302015-01-11T00:44:53+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून याच प्रक्रियेत शनिवारी नागपूर महानगर संघचालकपदी चार्टर्ड अकाऊन्टंट व नागपूर नागरी सहकारी

The election process of the team is going on | संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू

संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू

Next

लोया नवे महानगर संघचालक : ‘नंबर टू’साठी निवड प्रक्रिया सुरू
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघात संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून याच प्रक्रियेत शनिवारी नागपूर महानगर संघचालकपदी चार्टर्ड अकाऊन्टंट व नागपूर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश लोया यांची नियुक्ती करण्यात आली. महानगर सहसंघचालक पदावर श्रीधर गाडगे यांची नियुक्ती करण्यात आली. मार्च महिन्यात नागपूरमध्ये होणाऱ्या प्रतिनिधी सभेत संघाचे सरकार्यवाह (नंबर टू) या पदासाठी निवडणूक होईल.
शनिवारी सकाळी रेशीमबागस्थित स्मृती भवनात महानगर संघचालक पदासाठी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गत १६ वर्षापासून या पदावर कार्यरत डॉ. दिलीप गुप्ता यांच्या जागी राजेश लोया यांची निवड झाली. गुप्ता यांनीच लोया यांच्या नावाची शिफारस केली. त्यांतर लोया यांनी सहसंघचालक म्हणून श्रीधर गाडगे यांची नियुक्ती केली. यापूर्वी या पदावर लक्ष्मणराव पार्डीकर काम करीत होते.गाडगे यांच्याकडे संघ कार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. यांनी यापूर्वी विदर्भ प्रांत शारीरिक प्रमुख, बौद्धिक प्रमुख या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या असून प्रांत कार्यवाह म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या त्यांच्याकडे पश्चिम क्षेत्र शारीरिक प्रमुख म्हणून जबाबदारी कायम आहे. दादाराव भडके यांची पुन्हा एकदा प्रांत संघचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. या प्रक्रियेस गत नोव्हेंबरपासून सुरुवात झाली.
पहिल्या टप्प्यात शाखा प्रतिनिधींची निवड करण्यात आली. शहरातील ७ हजार स्वयंसेवकांमधून १५० शाखा प्रतिनिधीं निवडण्यात आले. त्यांनी आज महानगर संघचालक निवड प्रक्रियेत भाग घेतला. याच वेळी प्रतिनिधी सभेसाठी नागपूरच्या तीन स्वयंसेवकांची नावे निश्चित करण्यात आली. त्यात मोहन अग्निहोत्री, उदय वानखेडे, पुरुषोत्तम बोकडे यांचा समावेश आहे. सरकार्यवाहच्या निवडणूक प्रक्रियेत या तिघांना मताधिकार असेल. (प्रतिनिधी)
व्यक्तित्व विकासावर भर देणार -लोया
महानगर संघचालक म्हणून काम करताना व्यक्तित्व विकासावर भर देऊ, असे नवनिर्वाचित महानगर संघचालक राजेश लोया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नियोजन करून सोप्या पद्धतीने केल्यास कुठलेही काम कठीण नाही, असे ते म्हणाले. लोया प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटन्ट आहेत. इन्कम टॅक्स बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि हरिव्दार देव संस्कृत विद्यापीठाच्या आर्थिक समितीचे संयोजक आहेत.
भय्याजींची फेर निवड निश्चित
महानगर संघचालकांच्या निवड प्रक्रियेनंतर आता सर्वांचे लक्ष मार्च महिन्यात होणाऱ्या प्रतिनिधी सभेकडे लागले आहे. दर तीन वर्षांनी नागपूरमध्ये होणाऱ्या या सभेत सरकार्यवाह (संघातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पद) या पदाची निवडणूक होते. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधीं या निवडणुकीत मतदार असतात. २०१२ मध्ये या पदावर भय्याजी जोशी यांची निवड झाली होती. संघातील सूत्रानुसार यावेळी त्यांची फेरनिवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

Web Title: The election process of the team is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.