नागपूर व रामटेक लोकसभा निवडणूक निकाल 2019: अशी चालेल मतमोजणीची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 09:16 PM2019-05-22T21:16:02+5:302019-05-22T21:19:05+5:30

पं. जवाहरलाल नेहरू कळमना यार्ड परिसरात रामटेक व नागपूर या दोन्ही लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यासाठी दोन वेगवेगळे डोम तयार करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी बरोबर ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पोस्टल बॅलेट व ईव्हीएमची मोजणी एकाच वेळी सुरु केली जाईल. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटची मोजणी होईल.

Elections for Nagpur and Ramtek Loksabha Elections 2019: This process of counting of votes will be done | नागपूर व रामटेक लोकसभा निवडणूक निकाल 2019: अशी चालेल मतमोजणीची प्रक्रिया

नागपूर व रामटेक लोकसभा निवडणूक निकाल 2019: अशी चालेल मतमोजणीची प्रक्रिया

Next
ठळक मुद्देसकाळी ८ वाजता सुरू होणार मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पं. जवाहरलाल नेहरू कळमना यार्ड परिसरात रामटेकनागपूर या दोन्ही लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यासाठी दोन वेगवेगळे डोम तयार करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी बरोबर ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पोस्टल बॅलेट व ईव्हीएमची मोजणी एकाच वेळी सुरु केली जाईल. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटची मोजणी होईल.


मतमोजणी केंद्रापासून ४०० मीटर अंतरावर स्ट्राँग रुम बनविण्यात आली आहे. यात रामटेक व नागपूर या दोन्ही लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलेल्या आहेत. सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि नंतर स्थानिक पोलिसांची सुरक्षा आहे. दोन्ही लोकसभेच्या जागेसाठी दोन वेगवेगळ्या स्ट्राँग रुम आहेत. स्ट्राँग रुमचे शटर कुलूप लावून सील केले असून, त्याच्यासमोर विटा-सिमेंटची भिंत बनविण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ६.३० वाजता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर भिंत तोडून सील काढून ईव्हीएम काढल्या जातील. 

विधानसभानिहाय मतमोजणी होईल. १०-१० असे एकूण २० टेबल राहतील. प्रत्येक लाईनची जबाबदारी तहसीलदार किंवा नायब तहसीलदार स्तराच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तो त्या लाईनचा ‘रो ऑफिसर’ राहील. तो मतांची मोजणी करण्यासाठी टेबलवर बसलेल्या कर्मचाऱ्यास ईव्हीएम मशीन देईल तसेच मोजणी झाल्यावर ती सील करून ठेवण्याची जबाबदारीही त्याची राहील. ईव्हीएममध्ये रिझल्ट बटन दाबल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला मिळालेले मत डिस्प्ले होतील. एका उमेदवाराचे मत ७ सेकंदपर्यंत दिसून येतील. अशा परिस्थितीत नागपूरच्या ३० उमेदवारांसह एक नोटा असे एकूण ३१ पर्याय आहेत. त्याप्रकारे एका ईव्हीएममध्ये उमेदवारांच्या मतांचा डिस्प्ले २१० सेकंदपर्यंत राहील. ही मते मॅन्युअल आणि कॉम्प्युटरने मोजले जातील. प्रत्येक फेरीनंतर एआरओ या दोघांची तपासणी करतील. यानंतर ते ऑब्झर्व्हरकडे पाठवले जातील. त्यांनी पाहिल्यानंतरच आकडे जारी केले जातील. प्रत्येक फेरीत असे होईल. सर्वात शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी सर्व उमेदवारांना मिळालेली एकूण मते जाहीर करून विजयी उमेदवाराची घोषणा करतील तसेच विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान करतील.
८८८ कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग
मतमोजणीसाठी प्रत्यक्षात ८८८ कर्मचारी सहभागी होतील. यामध्ये नागपूर लोकसभेसाठी ४४४ आणि रामटेकसाठी ४४४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या वाहनातून येतील ईव्हीएम
ईव्हीएमच्या वाहतुकीचे नियम अतिशय कडक आहेत. रामटेक आणि नागपूर या दोन्ही लोकसभेच्या ईव्हीएम मशीन स्ट्राँग रुममधून सहा-सहा वाहनांमधून आणल्या जातील. यासाठी केवळ मारुती ओम्नी या गाड्याच वापरल्या जातील. त्यांचा रंगही ठराविक राहील. एका लोकसभेच्या ईव्हीएमची वाहतूक करणाऱ्या गाडीचा रंग पिवळा तर दुसऱ्या वाहनाचा रंग पांढरा राहील. नागपूरच्या ईव्हीएम घेऊन येणारे वाहन हे रस्त्याच्या उजव्या बाजूने तर रामटेकच्या डाव्या बाजूने आणल्या जातील. ही पूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केली जाईल. या कॅमेऱ्यांचा डिस्प्ले मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या खुर्चीजवळ राहील.

Web Title: Elections for Nagpur and Ramtek Loksabha Elections 2019: This process of counting of votes will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.