ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:48+5:302021-09-02T04:17:48+5:30

नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने १७ महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होऊ ...

Elections should not be held without OBC reservation | ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत

Next

नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने १७ महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होऊ दिल्या जाणार नाही, असा इशारा भाजप ओबीसी मोर्चाने बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

ओबीसी मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष रमेश चोपडे म्हणाले, या मागणीसाठी ३ सप्टेंबर रोजी संविधान चौकात सकाळी ११ वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप ओबीसी मोर्चातर्फे आंदोलन केले जाईल. पुढे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे आंदोलन करून वॉर्डस्तरापर्यंत जनजागृती केली जाईल, अशी घोषणा चोपडे यांनी केली. यानंतरही निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला तर न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला माजी महापौर अर्चना डेहनकर, पश्चिमचे अध्यक्ष नरेश बरडे, धर्मपाल मेश्राम, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, रमेश गिरडे, मनोहर चिकटे, सुनील चिमोटे, रामभाऊ आंबुलकर, सविता पाटणे, घनश्याम खवले, रविश देशमुख, सुरेश कोंगे आदी उपस्थित होते.

Web Title: Elections should not be held without OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.