नागपुरातील व्हीएनआयटी कॅम्पसमध्ये इलेक्ट्रीक बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:14 PM2019-06-13T22:14:35+5:302019-06-13T22:15:31+5:30
विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी (व्हीएनआयटी) अॅल्युम्नी असोसिएशनच्यावतीने कॅम्पसमध्ये विद्यार्थी, पालक आणि विशेषत: विद्यार्थिनींसाठी बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रीक व्हेईकल उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे प्रशस्त अशा व्हीएनआयटी कॅम्पसमध्ये या विभागातून त्या विभागात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सुविधा झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी (व्हीएनआयटी) अॅल्युम्नी असोसिएशनच्यावतीने कॅम्पसमध्ये विद्यार्थी, पालक आणि विशेषत: विद्यार्थिनींसाठी बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रीक व्हेईकल उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे प्रशस्त अशा व्हीएनआयटी कॅम्पसमध्ये या विभागातून त्या विभागात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सुविधा झाली आहे.
विशेष म्हणजे व्हीएनआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेतर्फे या संस्थेत नि:स्वार्थ भावनेने सेवाकार्य करण्यात येते. अशा विविध सेवाकार्यांतर्गतच ही इलेक्ट्रीक बस उपलब्ध करण्यात आली आहे. ही बस पर्यावरणाच्या दृष्टीनेही लाभदायक असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हीएनआयटीच्या १९८३ बॅचच्या सलीला देशपांडे-कामत व वंदना उड्डनवाडीकर-वारनेकर यांच्यातर्फे देण्यात आली आहे. बससेवेच्या उद्घाटनप्रसंगी व्हीएनआयटीच्या संचालक मंडळाचे चेअरमन डॉ. विश्राम जामदार, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, फॅकल्टी वेलफेअरचे अधिष्ठाता डॉ. दिलीप पेशवे, व्हीएनआयटी अॅल्युम्नी असोसिएशनचे संचालक शशिकांत चौधरी, कोषाध्यक्ष उदय कामत, जोगिंदरसिंह सोंद, प्रमोद पमपतवार, दिलीप कामदार, अशोक अग्रवाल, मनोज इटकेलवार, डॉ. अंजली धांडे-जुनघरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.