आयटीआय विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:09 AM2021-05-08T04:09:50+5:302021-05-08T04:09:50+5:30
काेराडी : इमर्ज वर्क फाॅर्स, डिव्हाईस इलेक्ट्रॉनिक्स पुणे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ...
काेराडी : इमर्ज वर्क फाॅर्स, डिव्हाईस इलेक्ट्रॉनिक्स पुणे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विभागातील सर्व शासकीय व खासगी औद्याेगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहन या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते.
या कार्यशाळेत एकूण २,८०० विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले हाेते. यात विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व, त्या वाहनांच्या वापरामुळे कमी हाेणारे वायू व आवाज प्रदूषण, कोर्स डिझाईन करणे, इन्स्ट्रक्टरसाठी सादर करणे, राेजगार मिळविणे, स्वयंराेजगगार सुरू करणे यासह इतर महत्त्वाच्या विषयावर औद्योगिक आस्थापनेतील शेखर मलानी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या आयाेजनासाठी नागपूरच्या निरीक्षक सीमा महाजन, नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य हेमंत वारे, गट निर्देशक डॉ. अजय बेलझलवार, इमर्ज वर्क फॉर्सचे प्रतिनिधी अर्पण चक्रवर्ती यांनी सहकार्य केले.