इलेक्ट्रिक वाहने हजारोंच्या घरात; चार्जिंग कुठे करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2022 07:00 AM2022-10-16T07:00:00+5:302022-10-16T07:00:01+5:30

Nagpur News नागपूर शहरात ८ हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने आहेत. यात दररोज २५ ते ३० वाहनांची भर पडत आहे. मात्र चार्जिंग स्टेशन नसल्याने घरच्याच विजेवर वाहने चार्जिंग करावी लागतात.

Electric vehicles in thousands of homes; Where to charge? | इलेक्ट्रिक वाहने हजारोंच्या घरात; चार्जिंग कुठे करणार?

इलेक्ट्रिक वाहने हजारोंच्या घरात; चार्जिंग कुठे करणार?

googlenewsNext
ठळक मुद्देलांब प्रवासातही अडचणीचार्जिंग स्टेशन वाढविण्याची गरज

नागपूर : पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमती विचारात घेता मागील दीड-दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली आहे. नागपूर शहरात ८ हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने आहेत. यात दररोज २५ ते ३० वाहनांची भर पडत आहे. मात्र चार्जिंग स्टेशन नसल्याने घरच्याच विजेवर वाहने चार्जिंग करावी लागतात.

शहरात महापालिकेने इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. मात्र, या स्टेशनची क्षमता कमी आहे. तर दुसरे स्टेशन वाडी येथे लवकरच सुरू केले जाणार आहे. काही खासगी व्यावसायिकांचे चार्जिंग स्टेशन आहेत. ही संख्या फारच कमी असल्याने खासगी वाहनधारकांना दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने घरातील इलेक्ट्रिकवर चार्जिंग करावी लागतात.

इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत १२८ टक्के वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२२-२३ या वर्षांच्या सहा महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री १२८ टक्क्यांनी वाढली आहे. दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांची दररोज भर पडत आहे. मात्र, लांब प्रवासासाठी या गाड्यांचा वापर करताना चार्जिंगची समस्या आहे. त्यामुळे शहरालगतच्या भागात ये-जा करण्यासाठी या वाहनांचा वापर केला जातो.

चार्जिंग स्टेशन्स कधी वाढणार?

शहरात चार्जिंग स्टेशनची सुविधा नसल्याने इलेक्ट्रिक वाहनधारकांना घरातच वाहने चार्जिंग करावी लागतात. यामुळे वीज बिलात फारसी वाढ झाली नसल्याची माहिती इलेक्ट्रिक वाहनधारकांनी दिली. यामुळे शहरात चार्जिंग स्टेशन कधी वाढणार, याची इलेक्ट्रिक वाहनधारकांना प्रतीक्षा आहे.

दीड वर्षात ८ हजारांवर इलेक्ट्रिक वाहने

२०२१-२२ या आर्थिक वर्षात शहरात एकूण ३०८८ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली, तर २०२२-२३ या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ५ हजारांच्या आसपास नवीन वाहनांची नोंद झाली. याचा विचार करता शहरात ८ हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने आहेत.

१ ते १० ऑक्टोबर दरम्यान नागपुरात झालेली नोंदणी

- १७६ इलेक्ट्रिकची दुचाकी वाहने रस्त्यांवर आली.

- ७७ इलेक्ट्रिकची तीनचाकी वाहने रस्त्यांवर आली.

-५ फोर व्हीलर वाहनांची नोंदणी करण्यात आली.

Web Title: Electric vehicles in thousands of homes; Where to charge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.