इलेक्ट्रिसिटी ॲक्टविराेधात विद्युत कर्मचारी करणार संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:08 AM2021-07-25T04:08:44+5:302021-07-25T04:08:44+5:30
कृती समितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेऊन तिन्ही वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाला नाेटीस पाठविण्यात आले. यामध्ये १० ऑगस्ट राेजी संप करण्याचे ...
कृती समितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेऊन तिन्ही वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाला नाेटीस पाठविण्यात आले. यामध्ये १० ऑगस्ट राेजी संप करण्याचे नमूद केले आहे. केंद्र सरकारने जर आततायीपणे हा कायदा संसदेत पारित केला तर त्याच दिवशीपासून संप सुरू करण्याचा इशारा देण्यात आला. या बैठकीत वर्कर्स फेडरेशनचे कृष्णा भोयर, सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे संजय ठाकूर, वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सैयद जहिरुद्दीन, वीज कामगार काँग्रेसचे दत्तात्रय गुट्टे, वीज कर्मचारी-अधिकारी सेनेचे राजन भानुशाली, स्वाभिमानी वर्कर्स युनियनचे पी.बी. उके उपस्थित हाेते. कृती समितीच्या मते प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी ॲक्ट व स्टॅन्डर्ड बिलिंग डाॅक्युमेंटमुळे खासगीकरणाला वाव मिळेल. यामुळे हा कायदा रद्द करणे गरजेचे आहे. इतर मागण्यांमध्ये फ्रेंचाईजीकरण राेखणे, अनुबंधित तसेच आऊटसाेर्स कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.