गडचिरोलीतील सर्व लाभार्थ्यांना १५ आॅक्टोबरपर्यंत वीजजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 08:36 PM2018-09-27T20:36:50+5:302018-09-27T20:56:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी वीज योजना ‘सौभाग्य’ला यशस्वी करण्यासाठी येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक संभाव्य लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक, भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत. ह्या योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रादेशिक संचालकांनी मागील दोन दिवसांत संपूर्ण गडचिरोली जिल्हा पिंजून काढला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील दुर्गम भागांना भेटी देत वीज जोडणीच्या संभाव्य कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत दिशानिर्देश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी वीज योजना ‘सौभाग्य’ला यशस्वी करण्यासाठी येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक संभाव्य लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक, भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत. ह्या योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रादेशिक संचालकांनी मागील दोन दिवसांत संपूर्ण गडचिरोली जिल्हा पिंजून काढला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील दुर्गम भागांना भेटी देत वीज जोडणीच्या संभाव्य कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत दिशानिर्देश दिले आहेत.
प्रादेशिक संचालक यांच्या नेतृत्वात नागपूर प्रादेशिक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चंद्रपूर परिमंडल आणि गडचिरोली मंडलातील काही निवडक अधिकाऱ्यांनी मंगळवार आणि बुधवारी जिल्ह्यात सर्वत्र भेटी देत तेथे सुरू असलेल्या सौभाग्य योजनेच्या कामांची पाहणी केली, तेथील गावकऱ्यांशी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवादही साधला. येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व संभाव्य लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यासाठी एका विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सोबतच प्रादेशिक स्तरावरही एका विशेष समितीचे गठन करण्यात आले असून ही समिती गडचिरोली जिह्यात होणाऱ्यां सौभाग्य योजनेच्या दैनंदिन कामांचा आढावा घेणार आहे. यावेळी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्यासमवेत महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, गडचिरोली मंडल आणि नागपूर प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.