नागपुरात मेंटेनन्सच्या नावावर ७ तास वीज बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:43 PM2020-03-16T23:43:57+5:302020-03-16T23:45:13+5:30

महावितरणचे मेंटेनन्सचे काम संपायचे नावच घेत नाही आहे. या आठवड्यात बुधवारी कंपनीने वर्धमाननगर परिसरात सात तास वीज बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.

Electricity will be stopped for 7 hours in the name of maintenance in Nagpur | नागपुरात मेंटेनन्सच्या नावावर ७ तास वीज बंद राहणार

नागपुरात मेंटेनन्सच्या नावावर ७ तास वीज बंद राहणार

googlenewsNext
ठळक मुद्देबुधवारी महावितरण देणार ‘शॉक’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणचे मेंटेनन्सचे काम संपायचे नावच घेत नाही आहे. या आठवड्यात बुधवारी कंपनीने वर्धमाननगर परिसरात सात तास वीज बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. या आठवड्यात मेंटेनन्सच्या नावावर वीज बंद ठेवणे आता चर्चेचा विषय झाला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, जेव्हा वीज वितरण यंत्रणा इतकी देखभाल दुरुस्ती करीत आहे तर शहरात अचानक वीज बंद का होत असते. दर आठवड्यात मेंटेनन्सनंतरही वीज वितरण यंत्रणेची कार्यपद्धती किती ढेपाळलेली आहे याचे उदाहरण महाराजबाग, अमरावती रोड परिसरात आजही स्पष्ट दिसून आले. या परिसरात दिवसभरात दोन ते तीन वेळा वीज बंद राहिली. यावर कंपनीचे म्हणणे आहे की, तांत्रिक कारणामुळे वीज बंद राहिली. परंतु दर आठवड्यात मेंटेनन्स केल्यानंतरही असे का होते? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दरम्यान, अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार १८ मार्च रोजी वर्धमान नगर आणि परिसरातील वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील, असे महावितरणने जाहीर केले आहे. बुधवारी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत अमरावती रोड, बोखारा आणि गोधनी उपकेंद्रातील सर्व भाग, फेटरी, खरबी, वाडी शहर फीडर,चिंचभवन फीडर, सकाळी ९ ते १२ या वेळेत सहकारनगर, नरकेसरी ले-आऊट, लावा, खडगाव, हिंदुस्तान कॉलनी अमरावती रोड फीडर, अत्रे ले आऊट फीडर, धंतोली फीडर, सुभाष नगर फीडर, सकाळी ८ ते १० या वेळेत अपना भांडार फीडर, सीताबर्डी, दवलामेटी फीडर, सकाळी ८ ते ११ या वेळेत कर्वेनगर फीडर, हुडकेश्वर फीडर, नरसाळा रोड, मालवीय नगर फीडर येथील वीज पुरवठा बंद राहील. वैशालीनगर आणि कमाल टॉकीज फीडरवर एकात्मिक रस्ते विकास योजनेतील कामे पूर्ण करण्यासाठी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वीज पुरवठा बंद राहील.

Web Title: Electricity will be stopped for 7 hours in the name of maintenance in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.