सहा तास नागपूर जि.प.ची बत्ती गुल : ऑनलाईन कामे झाली प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 08:02 PM2020-11-04T20:02:56+5:302020-11-04T20:49:20+5:30

Nagpur ZP Electrisity shutdown जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचा वीज पुरवठा सकाळी १० पासून ठप्प झाला होता. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, कृषी, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन, महिला व बाल कल्याण, मनरेगा या महत्वाच्या कार्यालयातील कामकाज ठप्प पडले.

Electrisity shutdown of Nagpur ZP for six hours: Online works affected | सहा तास नागपूर जि.प.ची बत्ती गुल : ऑनलाईन कामे झाली प्रभावित

सहा तास नागपूर जि.प.ची बत्ती गुल : ऑनलाईन कामे झाली प्रभावित

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचा वीज पुरवठा सकाळी १० पासून ठप्प झाला होता. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, कृषी, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन, महिला व बाल कल्याण, मनरेगा या महत्वाच्या कार्यालयातील कामकाज ठप्प पडले. विजेच्या प्रतीक्षेत अनेक कर्मचारी बसून होते, काहींनी शेजारील दुबई बाजाराचा फेरफटका मारला. विशेष म्हणजे बांधकाम विभागाला याबाबत कुठलीही कल्पना नव्हती. जवळपास ६ तास जि.प. अंधारात होती.

वीज पुरवठा ठप्प पडल्याने ऑनलाईन कामे, व्हीसी आणि महत्त्वाचे प्रस्ताव वेळेत पूर्ण होऊ शकले नाही़ दरम्यान शिक्षण सभापती भारती पाटील यांनीही कार्यालयात भेट दिल्याची माहिती आहे. पण त्यावेळी अंधारच असल्याने, त्यांनी नाराजी व्यक्त केली. सकाळी १० वाजतापासून बत्ती गुल असल्याने कर्मचाऱ्यांनी ही आयती संधी न दवडता घर गाठले तर कुणी दुबई बाजारात पोहोचून खरेदीचा आनंद घेतला़ काही विभागात तर एकही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हता़ बत्ती गुल होण्याचे प्रकार जिल्हा परिषदेसाठी नवीन नाही़ मात्र, ६ तास वीज पुरवठा ठप्प होत असले आणि कुणाचेही लक्ष नसेल, हा प्रकार आश्चर्यकारक आहे.

 कार्यकारी अभियंत्याने घातले लक्ष

ही बाब बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर यांच्या कानावर घातली असता त्यांनी तातडीने संबंधित विद्युत उपअभियंताला स्पष्टपणे बजावले़ तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले़ त्यानंतर मात्र दहा मिनिटात पुरवठा सुरळीत केला़ महावितरणने हा पुरवठा बंद केल्याची बाब त्यांनी सांगितली़ २ वाजतानंतर काम सुरू केले़

Web Title: Electrisity shutdown of Nagpur ZP for six hours: Online works affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.