अकरावीच्या ५४२३० जागा : दोन दिवसात आठ हजारावर विद्यार्थ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:44 PM2019-06-21T22:44:16+5:302019-06-21T22:45:20+5:30

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या अर्जाचा भाग - २ भरण्यासाठी १९ जूनपासून सुरुवात झाली. दोन दिवसात ८६९३ विद्यार्थ्यांनी भाग-२ साठी अर्ज सादर केले. यात विज्ञान ५०९५, वाणिज्य २८८७, कला ५७२ व व्होकेशनलसाठी १३९ अर्जांचा समावेश आहे.

Eleventh class 54230 seats: Eight thousand Students apply in two days | अकरावीच्या ५४२३० जागा : दोन दिवसात आठ हजारावर विद्यार्थ्यांचे अर्ज

अकरावीच्या ५४२३० जागा : दोन दिवसात आठ हजारावर विद्यार्थ्यांचे अर्ज

Next
ठळक मुद्देभाग-१ साठी ३०९२१ अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या अर्जाचा भाग - २ भरण्यासाठी १९ जूनपासून सुरुवात झाली. दोन दिवसात ८६९३ विद्यार्थ्यांनी भाग-२ साठी अर्ज सादर केले. यात विज्ञान ५०९५, वाणिज्य २८८७, कला ५७२ व व्होकेशनलसाठी १३९ अर्जांचा समावेश आहे.
निकाल लागण्यापूर्वीच १ जूनपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात झाली. नागपूर मनपाच्या हद्दीतील ज्युनिअर कॉलेजमध्ये सर्व शाखांच्या मिळून ५४२३० जागा आहे. गुरुवारपर्यंत भाग-१ मध्ये ३०९२१ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे अजूनही १४ हजाराच्या जवळपास जागा रिक्त आहे.
गेल्या वर्षीचा विचार केल्यास ५४ हजार २३० जागांसाठी ४० हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी जवळपास ३६ हजार ६११ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविले होते. त्यामुळे जवळपास १७ हजार ६१९ जागा रिक्त राहिल्या होत्या. पण अजूनही भाग -१ चे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रवेशाचे वेळापत्रक
शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार सर्वप्रथम बायफोकल शाखेतील प्रवेश होतील. यानंतर जनरल शाखेतील प्रवेश होतील.
१) १९ ते २३ जून दरम्यान बायफोकल शाखेतील अर्जाचा दुसरा भाग भरला जाईल. तसेच १९ ते २८ दरम्यान बायफोकल वगळता इतर शाखेतील अर्ज १ व अर्ज २ भरले जातील. २४ जून रोजी दुपारी २ वाजता बायफोकलची प्रोव्हीजनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. २५ जून रोजी पहिली मेरिट लिस्ट जाहीर होईल. २६ व २७ रोजी ऑनलाईन प्रवेश होतील.
२) १ जुलै रोजी जनरल शाखेची मेरिट लिस्ट जारी होईल. २ व ३ जून रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात त्यातील त्रुटी दूर करून ५ जुलै रोजी अंतिम जनरल मेरिट लिस्ट जारी होईल. ८ ते १० जुलै रोजी ऑनलाईन प्रवेश होतील.
३) १० जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रकाशित करून ११ व १२ जुलै रोजी अर्जात संशोधन केले जाईल. १५ जुलै रोजी दुसरी जनलर मेरिट लिस्ट जारी होईल. १६ ते १८ जुलैदरम्यान ऑनलाईन प्रवेश होतील. १८ जुलै रोजी रिक्त जागा जाहीर केल्या जातील. १९ व २० जुलै रोजी अर्जात दुरुस्ती करता येईल. २३ जुलै रोजी तिसरी जनरल मेरिट लिस्ट जारी होईल.
४) २४ ते २६ जुलै दरम्यान प्रवेश घेता येईल. २६ जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रकाशित करून २७ ते २९ जुलैपर्यंत दुरुस्ती केली जाईल. ३० जुलै रोजी विशेष मेरिट लिस्ट जाहीर होईल. ३ ऑगस्ट रोजी रिक्त जागांची माहिती जारी होईल.

 

Web Title: Eleventh class 54230 seats: Eight thousand Students apply in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.