नागपुरात  सीएए-एनआरसी-एनपीआर विरुद्ध पुन्हा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 10:19 PM2020-02-07T22:19:21+5:302020-02-07T22:22:11+5:30

केंद्र सरकारच्या नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए), एनआरसी व एनपीआरविरुद्ध नागपुरातील नागरिकांनी पुन्हा एकदा आपला आवाज बुलंद केला. पश्चिम नागपुरातील नागरिकांनी संविधान बचाव रॅली काढली.

Elgar again against CAA-NRC-NPR in Nagpur |  नागपुरात  सीएए-एनआरसी-एनपीआर विरुद्ध पुन्हा एल्गार

 नागपुरात  सीएए-एनआरसी-एनपीआर विरुद्ध पुन्हा एल्गार

googlenewsNext
ठळक मुद्देगिट्टीखदान ते संविधान चौक निघाली संविधान बचाव रॅली विविध समाजातील बांधव व महिलांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए), एनआरसी व एनपीआरविरुद्ध नागपुरातील नागरिकांनी पुन्हा एकदा आपला आवाज बुलंद केला. पश्चिम नागपुरातील नागरिकांनी संविधान बचाव रॅली काढली. या रॅलीत मुसलमान, बौद्ध, शीख, ख्रिश्चन आदींसह विविध धर्मांचे, समाजाचे बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
पश्चिम नागपूर बहुजन संघर्ष समिती अंतर्गत गिट्टीखदान येथील फ्रेण्ड्स ग्राऊंड येथून या संविधान बचाव रॅलीला सुरुवात झाली. गिट्टीखदान चौक, बोरगाव चौक, अनंतनगर, अवस्थीनगर चौक, राजनगर, जुना काटोल नाका, बिजलीनगर, व्हीसीएमार्गे कस्तुरचंद पार्क होत ही रॅली संविधान चौकात पोहोचली. येथे या रॅलीचे सभेत रुपांतर झाले. रॅलीदरम्यान लोकांच्या हातात राष्ट्रध्वज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांचे छायाचित्र तसेच संविधान वाचवण्याबाबतचे विविध स्लोगन लिहिलेल्या पाट्या लक्ष वेधून घेत होत्या.
संविधान चौकात रॅलीला मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर रॅलीचा समारोप झाला. पश्चिम नागपूरचे आ. विकास ठाकरे, आ. प्रकाश गजभिये, शब्बीर विद्रोही, विजय बारसे आदींसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक व धार्मिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी या रॅलीत सामील होऊन आपला पाठिंबा दर्शविला.

Web Title: Elgar again against CAA-NRC-NPR in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.