पोलिसांच्या हक्कासाठी एल्गार
By Admin | Published: December 19, 2015 02:58 AM2015-12-19T02:58:45+5:302015-12-19T02:58:45+5:30
राष्ट्रनिर्माण संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी पोलिसांचे हक्क व अधिकारांसाठी पोलिसांचे कुटुंबीय व पोलीस मित्रांच्या मोर्चाने विधानभवनावर धडक दिली.
नागपूर : राष्ट्रनिर्माण संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी पोलिसांचे हक्क व अधिकारांसाठी पोलिसांचे कुटुंबीय व पोलीस मित्रांच्या मोर्चाने विधानभवनावर धडक दिली. यात महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. पोलीस विभाग हा स्वतंत्र सेवा देणारे संरक्षण दल आहे. त्यांना अनुशासन व शिस्तीचे पालन करावे लागते. त्यामुळे ते आपले हक्क व अधिकारांसाठी भांडूसुद्धा शकत नाही. पोलिसांची ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्र निर्माण संघटनेच्या माध्यमातून पोलिसांच्या कुटुंबीयांनी सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. या मोर्चाने दुपारी १ वाजताच्या सुमारास मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंट येथे धडक दिली. दरम्यान मोर्चेकऱ्यांनी शासनाविरुद्ध घोषणाबाजी करू न आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
मोर्चाचे नेतृत्व : विजय मारोडकर, नीलेश नागोलकर, प्रशांत भारती, ओम जयस्वाल, मिलिंद सोनोने व अनिल शाह यांनी केली.
४मागण्या : ४ आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलिसांनाही पगार देण्यात यावा.
४इतर विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही आठ तासाचीच ड्युटी असावी.
४आठ तासांपेक्षा अधिक काम झाल्यास नियमित ओव्हरटाईम भत्ता मिळावा.
४प्रत्येक पोलीस ठाण्यात एक रेस्ट रू म व वाचनालयाची व्यवस्था असावी.