पात्र होमगार्डने आपटले जमिनीवर डोके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 08:15 PM2019-09-03T20:15:24+5:302019-09-03T20:16:15+5:30
पात्र होमगार्ड उमेदवारांनी मंगळवारी संविधान चौकात जमिनीवर डोके आपटून आंदोलन केले. आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत प्रशासनाचा निषेध केला व आत्मदहनाचा इशाराही दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पात्र होमगार्ड उमेदवारांनी मंगळवारी संविधान चौकात जमिनीवर डोके आपटून आंदोलन केले. आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत प्रशासनाचा निषेध केला व आत्मदहनाचा इशाराही दिला.
भरपावसात जिल्ह्यातून आलेल्या पात्र होमगार्डने आंदोलन केले. ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासोबत चर्चेसाठी युवक काँग्रेस व पात्र उमेदवारांचे शिष्टमंडळ गेले असता ओला यांनी तीन दिवसांपूर्वीच हे प्रकरण आपल्याकडे आल्याचे सांगितले. यावर पात्र उमेदवारांनी १३ मार्चच्या भरतीमध्ये आम्ही सर्वांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले. यावर पोलीस अधीक्षक ओला यांनी ज्यांच्या गुणात फरक आहे त्यांची पूर्णपणे चौकशी करून पात्र उमेदवारांना सामावून घेऊ, असे आश्वासन दिले. यानंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी आशा पठाण यांची भेट घेऊन समस्या मांडली. यावेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांच्यासोबत एक बैठक लावून देण्याची विनंती केली.
धरणे आंदोलनात नगरसेवक बंटी बाबा शेळके, अमोल देशमुख, चंद्रपाल चौकसे, गज्जू यादव, तौसिफ खान, संजय सत्यकार, रमेश कारेमोरे रोहित खैरवार,सागर चव्हाण,प्रमोद ठाकूर,फजलुर कुरेशी,आकाश गुजर, तौसिफ अहमद, सुमित ढोलके, स्वप्निल ढोके, अजहर शेख, विजय मिश्रा, प्रणित बिसने, फरदीन खान, सौरभ शेळके, कविता हिंगणकर, रजनी राऊत, कल्पना कटरे, पिंकी सिंग, शमशाद बेगम, नीता सोमकुंवर, इस्लामिया शेख, अक्षय घाटोळे आदींनी भाग घेतला.