परीक्षेतील तांत्रिक अडथळे दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:09 AM2021-03-31T04:09:36+5:302021-03-31T04:09:36+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांची गाडी रुळावर आली आहे. मात्र इंटरनेट कनेक्टिव्हिटी तसेच तांत्रिक अडथळ्यांमुळे ...
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांची गाडी रुळावर आली आहे. मात्र इंटरनेट कनेक्टिव्हिटी तसेच तांत्रिक अडथळ्यांमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नाही. हे तांत्रिक अडथळे दूर करा अन्यथा जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे देण्यात आला आहे.
यासंदर्भात भाजयुमोच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. अभियांत्रिकी, बीए, बीकॉमच्या अनेक विद्यार्थ्यांना लॉगिन करता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. कुलगुरूदेखील उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे पोलिसांनी यात हस्तक्षेप करावा व परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजयुमो शहराध्यक्ष पारेंद्र पटले, प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश रहाटे यांच्यासह शेखर कुर्यवंशी, यश सातपुते, बादल राऊत, सन्नी राऊत, प्रसाद मुजुमदार उपस्थित होते.