१५६ अतिक्रमणांचा सफाया ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:08 AM2021-04-02T04:08:15+5:302021-04-02T04:08:15+5:30

मनपाची कारवाई : तीन ट्रक साहित्यासह तीन ठेले जप्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने गुरुवारी ...

Elimination of 156 encroachments () | १५६ अतिक्रमणांचा सफाया ()

१५६ अतिक्रमणांचा सफाया ()

googlenewsNext

मनपाची कारवाई : तीन ट्रक साहित्यासह तीन ठेले जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने गुरुवारी शहराच्या विविध भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून १५६ अतिक्रमणांचा सफाया केला. कारवाईदरम्यान तीन ट्रक साहित्यासह तीन ठेले जप्त करण्यात आले.

लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने प्रतापनगर चौक ते अंबाझरी रोड ते जयताळा बाजार परिसरातील ठेले व दुकाने हटविली. फूटपाथवरील अतिक्रमण काढले. पथकाने २४ अतिक्रमणे हटविली. धरमपेठ झोनच्या पथकाने फायर इंजिनिअरिंग कॉलेज येथील अस्थायी टिनाचे झोपडे हटविले. मनपा मुख्यालय परिसरातील लस्सी व ताक विकणाऱ्यांचे अतिक्रमण हटवून दंड वसूल केला.

धंतोली झोनच्या पथकाने शुक्रवारी तलाव परिसरातील अतिक्रमण काढले. रस्त्याच्या फूटपाथवरील ३२ अतिक्रमणे हटविण्यात आली. लकडगंज झोनच्या पथकाने झोन कार्यालय ते छाप्रूनगर ते वैष्णवदेवी चौक ते परत झोन कार्यालय रोडवरील २२ अतिक्रमणे हटविली. मासूरकर मार्ग ते आझमशहा चौक तसेच चंद्रशेखर रोडवरील ३६ अतिक्रमणे हटविली. दोन ट्रक साहित्य व तीन ठेले जप्त केले.

मंगळवारी झोनअंतर्गत झोन कार्यालय ते अंजुमन कॉम्प्लेक्स ते कॅनरा बँक ते लिबर्टी टॉकीज ते एनआयटी कार्यालय ते कस्तूरचंद पार्क, रेल्वेस्टेशन परिसर ते लिबर्टी टॉकीज, पागलखाना चौक ते मानकापूर ते गोधनी आदी भागातील ४२ अतिक्रमणे हटवून एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

Web Title: Elimination of 156 encroachments ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.