८६ अतिक्रमणांचा सफाया, तिन हातठेले केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:13 AM2021-08-14T04:13:14+5:302021-08-14T04:13:14+5:30

नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी धंतोली, मंगळवारी, धरमपेठ व आशीनगर झोनच्या विविध परिसरात कारवाई करून ८६ अतिक्रमणांचा ...

Elimination of 86 encroachments, confiscation of three hands | ८६ अतिक्रमणांचा सफाया, तिन हातठेले केले जप्त

८६ अतिक्रमणांचा सफाया, तिन हातठेले केले जप्त

Next

नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी धंतोली, मंगळवारी, धरमपेठ व आशीनगर झोनच्या विविध परिसरात कारवाई करून ८६ अतिक्रमणांचा सफाया केला. दरम्यान रस्ते, फूटपाथवर ठेवलेले तिघांचे ठेलेही जप्त केले. धंतोली झोन अंतर्गत पथकाने नरेंद्रनगर ते मनीषनगर, नरेंद्रनगर ते शताब्दी चौक, त्रिशरण चौक ते मेडिकल चौक आणि बालभवनपर्यंत ४३ अतिक्रमण हटविले. दुसऱ्या पथकाने मंगळवारी झोन अंतर्गत जरीपटकाच्या जिंजर मॉलजवळ कारवाई करून फूटपाथ आणि रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. त्यानंतर रेल्वेस्थानक रोड, कस्तूरचंद पार्कजवळ नारळ विक्रेता, पोहावाले आणि फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले. त्यानंतर पथकाने धरमपेठ झोनमध्ये आनंद टॉकीज जवळील दोन ठेले जप्त केले. तिसऱ्या पथकाने आशीनगर झोन अंतर्गत इंदोरा चौक ते चांभारनाला आणि कमाल चौकातील अतिक्रमण हटविले. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे उपायुक्त अशोक पाटील, निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर मालवे, विशाल ढोले, सुनिल बावने, नितीन मंथनवार, महेंद्र सुरडकर, मनोज गेडाम यांच्या पथकाने पार पाडली.

........

Web Title: Elimination of 86 encroachments, confiscation of three hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.