एलकुंचवारांची प्रकृती बिघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:32 AM2019-02-23T00:32:53+5:302019-02-23T00:33:59+5:30
९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळा सुरू असतानाच संमेलनाचे उद्घाटन महेश एलकुंचवार यांची प्रकृती बिघडली व पुस्तक विमोचनादरम्यानच ते सोफ्यावर बसले.
Next
ठळक मुद्देनंदनवन येथील दवाखान्यात हलविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळा सुरू असतानाच संमेलनाचे उद्घाटन महेश एलकुंचवार यांची प्रकृती बिघडली व पुस्तक विमोचनादरम्यानच ते सोफ्यावर बसले.
लागलीच नितीन गडकरी यांनी तत्परता दाखविली व स्वत:च्या गाडीतून एलकुंचवार यांना नंदनवन येथील दवाखान्यात पाठविले. दुसरीकडे ९८ व्या अ.भा.मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांची ‘शुगर’ वाढली. त्यामुळे त्यांचीदेखील कार्यक्रमस्थळी तपासणी करण्यात आली.