एअर प्रेशरमुळे विमानाचे नागपुरात इमरजन्सी लॅण्डींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 10:20 PM2019-04-26T22:20:34+5:302019-04-26T22:21:24+5:30

बेंगळुरुहून दिल्लीला जात असलेल्या गो-एअरच्या एक विमानाचे नागपूर विमानतळावर इमरजन्सी लॅँण्डींग करण्यात आले. या विमानातील प्रवाशांना बराच वेळ नागपूर विमानतळावर थांबवे लागले. शेवटी कंपनीने त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली. मात्र काही प्रवाशांनी तिकीट परत केले आणि दुसऱ्या एअरलाईनच्या विमानाने रवाना झाले.

Emergency landing in Nagpur due to air pressure | एअर प्रेशरमुळे विमानाचे नागपुरात इमरजन्सी लॅण्डींग

एअर प्रेशरमुळे विमानाचे नागपुरात इमरजन्सी लॅण्डींग

Next
ठळक मुद्देप्रवाशांना उपलब्ध करून दिले विशेष विमान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेंगळुरुहून दिल्लीला जात असलेल्या गो-एअरच्या एक विमानाचे नागपूर विमानतळावर इमरजन्सी लॅँण्डींग करण्यात आले. या विमानातील प्रवाशांना बराच वेळ नागपूर विमानतळावर थांबवे लागले. शेवटी कंपनीने त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली. मात्र काही प्रवाशांनी तिकीट परत केले आणि दुसऱ्या एअरलाईनच्या विमानाने रवाना झाले.
गो-एअरच्या जी८-७००१ बेंगळुरु-दिल्ली या विमानात अचानक एअर प्रेशरचा प्रॉब्लेम आला होता. प्रवासी प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ अनुभवत होते. प्रवाशांना त्रास होत असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्याने त्याने तात्काळ जवळच्या विमानतळावर उतरण्याचा निर्णय घेतला व नागपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे इमरजन्सी लॅण्डींग करण्याची अनुमती मागितली. दुपारी २.५० वाजता विमानाला सुरक्षित लॅण्ड करण्यात आले. दरम्यान रनवेच्या जवळ कुठलीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून फायर टेंडर सह इमरजन्सी लॅण्डींगसाठी आवश्यक तरतुदी तयार ठेवण्यात आल्या होत्या. लॅण्डींगनगर विमानाची शुक्रवारी रात्रीपर्यंत तपासणी सुरू होती. मात्र प्रवाशांना बराच काळ थांबावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विमान कंपनीने रात्री एका प्लाईटचे रिफंड पर्याय शोधला. प्रवाशांनीही त्याला मान्यता दिली. त्यानंतर ९.१० वाजता विमान दिल्लीकडे रवाना झाले. काही प्रवासी इंडिगोने रवाना झाले.
दुसरे विमान बोलविले होते
गो-एअरची २६ एप्रिलपासून तीन नवीन उड्डाणे सुरू झाली आहे. यात रात्री ९.२५ ला जी८-२५२० नागपूर-दिल्ली विमान आहे. त्यामुळे या उड्डाणासाठी विमानतळावर पूर्वीपासूनच विमान होते. इमरजन्सी लॅण्डींगनंतर त्याला विशेष प्लाईटचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे ९.२५ च्या नागपूर -दिल्ली फ्लाईटसाठी दुसरे विमान बोलविण्यात आले होते. विशेष म्हणजे गो-एअर नवीन विमानांमध्ये जी८-२१५५ सकाळी ९.१० वाजता दिल्लीसाठी, जी८ २५२० रात्री २१.५५ वाजता दिल्लीसाठी व सकाळी ८.५० वाजता जी८ २६०२ मुंबईसाठी आहे.

Web Title: Emergency landing in Nagpur due to air pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.