नागपुरात स्पाईसजेट विमानाचे आकस्मिक लॅण्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 10:51 PM2018-12-12T22:51:01+5:302018-12-12T22:51:53+5:30
बुधवारी सकाळी ६.४५ वाजता हैदराबाद येथून गुवाहाटीकडे जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे एका वयस्क महिला प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. वैमानिकाने महिलेची तब्येत बिघडल्याची सूचना नागपूरच्या हवाई नियंत्रण कक्षाला (एटीसी) देत आकस्मिक लॅण्डिंग केले. विमान सकाळी ९ वाजता गुवाहाटीकडे रवाना झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी सकाळी ६.४५ वाजता हैदराबाद येथून गुवाहाटीकडे जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे एका वयस्क महिला प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. वैमानिकाने महिलेची तब्येत बिघडल्याची सूचना नागपूरच्या हवाई नियंत्रण कक्षाला (एटीसी) देत आकस्मिक लॅण्डिंग केले. विमान सकाळी ९ वाजता गुवाहाटीकडे रवाना झाले.
स्पाईसजेटचे एसजी-४६३ विमान सकाळी ५.४५ वाजता हैदराबाद येथून गुवाहाटीडे रवाना झाले. ८२ जागांच्या विमानात १८-ई सीटवर ६५ वर्षीय देबिका चक्रबर्ती आणि १८-डीवर त्यांचा मुलगा प्रोनबीस चक्रवर्ती प्रवास करीत होते. विमानाने उड्डाण भरल्यानंतर ४५ मिनिटांत देबिका यांची तब्येत बिघडली. या घटनेची माहिती प्रोनबीसने क्रू सदस्याला तर क्रूने वैमानिकाला दिली. वैमानिकाने नागपूर एटीसीकडून परवानगी घेऊन विमान सकाळी ६.४५ वाजता विमानतळावर उतरविले. स्पाईसजेट सेवांशी जुळलेली कंपनी ज्यूनस एव्हिएशन प्रा. लि.चे पर्यवेक्षक कामरान शम्स यांना सूचना मिळतात त्यांनी त्वरित घटनेची माहिती विमानतळावरील अधिकाºयांना दिली आणि अॅम्ब्युलन्स मागितली. त्यानंतर देबिका यांना रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी रुग्णाला २४ तास निगराणीत ठेवण्याचा सल्ला दिला. देबिका यांच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे.
इंडिगोच्या तीन उड्डाणांचा आॅनलाईन लपंडाव!
इंडिगो एअरलाईन्सचे तीन उड्डाण आॅनलाईनवर दिसून येतात तर कधी गायब होतात. गेल्या दोन आठवड्यापासून कंपनीचा असा लपंडाव सुरू आहे. इंडिगोच्या या उड्डाणांमध्ये ६ई-३८८ नागपूर-इंदूर, रात्री १०.३५ वाजता येणारे ६ई-९०९ नागपूर-बेंगळूरू आणि सकाळी ७.१० च्या ६ई-६६४ नागपूर-कोलकाताचा समावेश आहे.
असे दिसून आले की, कोणतेही विमान कोणत्यातरी दिनविशेषवर रद्द असते. परंतु हे उड्डाण एक दिवस तर कधी दोन दिवसांपेक्षा जास्त काळ रद्द असते. पुढील सात दिवसानंतर या उड्डाणाची स्थिती काय राहील, या संदर्भात स्थानिक स्तरावर ठोस माहिती नाही, ही बाब आश्चर्यजनक आहे. प्रवाशांची संख्या कमी असल्यास विमानाचे उड्डाण रद्द करण्यात येत असल्याचे नेहमीच आढळून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. अॅडव्हान्स बुकिंग असल्यास आणि पुढेमागे बुकिंगच्या स्थितीवर लक्ष ठेवून विमानाचे उड्डाण होते वा रद्द करण्यात येते. उदाहरण द्यायचे झाल्यास रात्री १०.३० वाजताचे नागपूर-बेंगळुरू विमान-९०९ चे उड्डाण १५ डिसेंबरला होणार नाही, पण १६ आणि १७ डिसेंबरला उपलब्ध आहे. सायंकाळी ७.१० वाजताचे विमानाचे उड्डाण १५ फेब्रुवारीपर्यंत रद्द असल्याचे आॅनलाईनवर दिसून येत आहे.