लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरूनगर झोनमध्ये पाणीपुरवठा बाधित, १३०० मिमी फीडर लाइनची आपत्कालीन दुरूस्ती
By मंगेश व्यवहारे | Published: November 25, 2023 10:10 PM2023-11-25T22:10:31+5:302023-11-25T22:12:19+5:30
लकडगंज झोन अंतर्गत भरतवाडा, कळमना, सुभाननगर, मिनीमातानगर, भांडेवाडी, लकडगंज १, लकडगंज २, बाबुळबन पारडी १ आणि पारडी २ हे जलकुंभ आहे.
नागपूर : कन्हान १३०० मिमीच्या फिडर लाईनवर जगनाडे चौक आणि प्रजापती चौक दरम्यान लिकेज आढळल्याने तत्काळ दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दुरूस्ती होईपर्यंत लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरूनगर झोनमधील वस्त्यांचा पाणीपुरवठा थांबविण्यात आला आहे.
लकडगंज झोन अंतर्गत भरतवाडा, कळमना, सुभाननगर, मिनीमातानगर, भांडेवाडी, लकडगंज १, लकडगंज २, बाबुळबन पारडी १ आणि पारडी २ हे जलकुंभ आहे. या जलकुंभावरून शेकडो वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातो. या वस्त्यांना दुरूस्ती होईपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही.
सतरंजीपुरा झोन अंतर्गत शांतिनगर, वांजरी, विनोबा भावेनगर, कळमना हे जलकुंभ आहे. या जलकुंभावरून किमान ५० च्या जवळपास वस्त्यांना पाणी पुरवठा होतो. त्या वस्त्यांही पाण्यापासून वंचित राहणार आहे. नेहरूनगर झोन अंतर्गत नंदनवन जुने, नंदनवन १, नंदनवन २, ताजबाग, खरबी हे जलकुंभ येतात. या जलकुंभावरूनही शेकडो वस्त्यांना पाणी पुरवठा होतो. तोही बाधित राहणार आहे. विशेष म्हणजे टँकरनेही पाणी पुरवठा होणार नसल्याचे ओसीडब्ल्यूतर्फे सांगण्यात आले आहे.