शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषी वानिकी योजनांवर भर द्या : वनराज्यमंत्र्यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 09:17 PM2020-02-29T21:17:24+5:302020-02-29T21:19:28+5:30
राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्रीसंजय राठोड यांनी केले.
वन राज्यमंत्री म्हणून पदाची सूत्रे स्वीकारल्यावर संजय राठोड यांनी शनिवारी प्रथमच वनभवन कार्यालयाला दिलेल्या भेटीत येथील कंट्रोल कंमाड रूमला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण कार्यालयात फिरून येथील कामकाज जाणून घेतले. अधिकाऱ्यांच्या कक्षांचीही पाहणी केली.
बैठकीच्या प्रारंभी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. एन. रामबाबू यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. वनभवन येथील कंमाड कंट्रोल रूमविषयक माहिती दिली. प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांनी वनविभागाच्या सर्व योजनांच्या आर्थिक बाबीचा आढावा घेणारे सादरीकरण केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान व धोरण) एम. के. राव यांनी वनविभागाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी सादरीकरण केले. ५० कोटी वृक्ष लागवडीच्या सर्व नोंदीची व जीएसआय प्रणालीची माहिती दिली.
यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) प्रवीण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर आदी उपस्थित होते. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (केंद्रस्थ अधिकारी) संजीव गौड, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज) टी. के. चौबे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) शैलेश टेंभूर्णीकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) मोहन कर्नाट, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) बी.एस.हुडा, मुख्य वनसंरक्षक (प्रा) नागपूर कल्याण कुमार, पेंच व्याघ्र प्रकल्प संचालक गोवेकर, प्रसिद्धी व माहिती अधिकारी (वने) स्नेहल पाटील उपस्थित होत्या. वनभवन येथील आढावा बैठकीनंतर सेमिनरी हिल्स येथील हायटेक नर्सरीचीही त्यांनी पाहणी केली.