विना सर्जनचे नागपुरातील  कामगार रुग्णालय : रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:51 PM2019-06-28T22:51:52+5:302019-06-28T22:52:32+5:30

कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात गेल्या महिन्याभरापासून शल्यचिकित्सकच (सर्जन) नाही. परिणामी, शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मेडिकलला पाठविले जात आहे. औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव व रिक्त पदांमुळे आधीच रुग्णालय प्रशासन अडचणीत आले असताना आता ‘सर्जन’ नसल्याने रुग्णांच्या रोषालाही सामोरा जावे लागत आहे.

Employee Hospital in Nagpur without any surgeon | विना सर्जनचे नागपुरातील  कामगार रुग्णालय : रुग्णांची हेळसांड

विना सर्जनचे नागपुरातील  कामगार रुग्णालय : रुग्णांची हेळसांड

Next
ठळक मुद्देशस्त्रक्रियेसाठी ‘रेफर टू’ मेडिकल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात गेल्या महिन्याभरापासून शल्यचिकित्सकच (सर्जन) नाही. परिणामी, शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मेडिकलला पाठविले जात आहे. औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव व रिक्त पदांमुळे आधीच रुग्णालय प्रशासन अडचणीत आले असताना आता ‘सर्जन’ नसल्याने रुग्णांच्या रोषालाही सामोरा जावे लागत आहे.
कामगार विमा रुग्णालयात शल्यचिकित्सकांची दोन पदे होती. यामुळे सामान्य शस्त्रक्रिया सुरू होत्या. परंतु काही महिन्यापूर्वी शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र कोडवथे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. यामुळे एक पद रिक्त झाले. दुसऱ्या पदावर डॉ. जया हेमनानी होत्या. परंतु त्या ११ महिन्यांच्या कंत्राटपद्धतीवर होत्या. गेल्याच महिन्यात त्यांचे कंत्राट संपले. रुग्णालय प्रशासनाने कंत्राट नुतनीकरणाचा प्रस्ताव पाठविला, परंतु अद्याप यावर निर्णय झालेला नाही. परिणामी, शल्यक्रियेच्या रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविले जात आहे.
७७ वर्षीय वृद्धाला पाठविले मेडिकलमध्ये
सरोदेनगर, वाठोडा ले-आऊट येथील ७७ वर्षीय वृद्ध हे हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी कामगार रुग्णालयात आले असताना ‘सर्जन’ नसल्याचे कारण सांगून मेडिकलमध्ये पाठविले. कामगार रुग्णालयात उपचारासाठी पगारातून पैशांची कपात होत असताना मेडिकलला का पाठविता असा सवाल, रुग्णाच्या मुलाने विचारला असता, रुग्णालय प्रशासनाकडे त्याचे उत्तर नव्हते. संलग्न रुग्णालयात रुग्णाला पाठविण्याची व्यवस्था करा, अशी विनंती मुलाने केली. परंतु त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. रुग्णांना छोट्याछोट्या शस्त्रक्रियेसाठी मेडिकल गाठावे लागत असल्याने रुग्णालयाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Employee Hospital in Nagpur without any surgeon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.