मनपापुढे कर्मचारी व शिक्षकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 08:56 PM2020-09-10T20:56:33+5:302020-09-10T20:57:50+5:30
महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या विविध मागण्या मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. कोरोना काळात कर्मचारी व शिक्षक कोरोना योद्धा बनून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे गुरुवारी मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या विविध मागण्या मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. कोरोना काळात कर्मचारी व शिक्षक कोरोना योद्धा बनून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे गुरुवारी मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, जनरल सेके्रटरी रंजन नलोडे, कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे, बाबा श्रीखंडे, संजय मोहले, पुरुषोत्तम कैकाडे, दत्तात्रय डहाके, हेमराज शिंदेकर, बळीराम शेंडे, मारोती नासरे, सत्यवान मेश्राम, अरुण तुर्केल, अनिल पुंजे, योगेश नागे, योगेश बोरकर, अभय अप्पनवार, प्रकाश चमके, नारायण वानखेडे, कुणाल यादव, पुष्पा वर्मा, सरिना सूडसाम, संध्या डोंगरे, संजय गाटकिने, कुणाल मोटघरे, शितल जांभुळकर, सीमा मेश्राम, मालती जांभुळकर, यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.
अशा आहेत मागण्या
- मनपातील कर्मचारी, शिक्षक व सेवानिवृत्तांना सातवा वेतन आयोग लागू करा.
- जीपीएफ व डीसीपीएसची १७५ कोटी रक्कम १५ दिवसात जमा करा.
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना विमा कवच कोविड १९ अंतर्गत ५० लाखाची रक्कम वारसांना द्या.
- मृतांच्या वारसाला अनुकंपावर नियुक्ती द्या.
- कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता कार्यालयात कर्मचारी उपस्थिती ३० टक्के करा.
- कर्मचाऱ्यांना कोरोना बाधा झाल्यास मोफत विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करा.