संपासाठी कर्मचारी व कामगार संघटना सज्ज
By Admin | Published: September 2, 2015 04:19 AM2015-09-02T04:19:05+5:302015-09-02T04:19:05+5:30
केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी विरोधी धोरण, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, बेरोजगारी,श्रम कायदा , बेकायदेशीर
आज देशव्यापी संप : जिल्ह्यातील ५५ हजार कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचा दावा, काहींचा मात्र विरोध
नागपूर : केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी विरोधी धोरण, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, बेरोजगारी,श्रम कायदा , बेकायदेशीर ठेकेदारीवर प्रतिबंध घालण्यात यावा. आदी मागण्यासाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, देशातील ११ केंद्रीय कामगार संघटना, उद्योग, सेवा आस्थापनावरील कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र महासंघाने केलेल्या आवाहनानुसार २ सप्टेंबरला होणाऱ्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटनांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील ५५ हजार कर्मचारी सहभागी होणार असून हा संप शंभर टक्के यशस्वी होईल, असा दावा विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र व म.रा.जि.प.कर्मचारी संघटना यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात हा संप यशस्वी करण्याचे संयुक्त आवाहन केले आहे. मात्र काही संघटनांनी या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
राज्य जि.प.कर्मचारी महासंघ
कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात संयुक्त क ृती समितीच्या वतीने आयोजित संपात जिल्हा परिषदेतील कर्मचारी सहभागी होतील. हा संप शंभर टक्के यशस्वी होईल.
अशोक थूल
प्रदेश सरचिटणीस, म.रा. जि.प.कर्मचारी महासंघ
वन व सामाजिक वनीकरण
कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात संयुक्त क ृती समितीच्या वतीने आयोजित संपात वन विभागाच्या सर्व विभागीय कार्यालयातील कर्मचारी या संपात सहभागी होत आहे. हा संप यशस्वी होईल.
प्रदीप शेंडे
कार्याध्यक्ष,महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कर्मचारी संघटना
कर्मचारी मध्यवर्ती संघटना
केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात हा संप आहे. यात राज्य सरकारी कर्मचारी सहभागी होत आहे. या निमित्ताने कामगार व कर्मचाऱ्यांची एकजूट बघायला मिळणार आहे.
नारायण समर्थ
कार्याध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना
शासकीय वाहन चालक संघटना
कामगाराच्या विविध मागण्या मार्गी लागाव्या, यासाठी पुकारण्यात आलेला लाक्षणिक संप शंभर टक्के यशस्वी होईल. विभागातील शासकीय वाहनावरील वाहन चालक या संपात सहभागी होतील.
नाना कडवे
कार्याध्यक्ष, शासकीय वाहन चालक संघटना
सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन
केंद्र व राज्य सरकार उद्योगपतींच्या दबावात काम करीत आहे. कामगार कायद्यात बदल करून त्यांच्या सेवा सुरक्षेवर हल्ला करीत आहे. याला आळा घालण्यासाठी २ सप्टेंबरच्या संपात सहभागी होण्याचा निर्णय सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स ने घेतला आहे. हा संप शंभर टक्के यशस्वी होईल.
विश्वनाथ आसई
महासचिव, सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन
महसूल कर्मचारी तृतीय वर्ग
महसूल विभागातील तृतीय कर्मचारी या संपात सहभागी होत आहे. नागपूर जिल्ह्णातील ४५० तर विभागातील ४ हजार कर्मचारी सहभागी होतील. महसूल विभागात हा संप यशस्वी होईल.
प्रमोद बेले
कार्याध्यक्ष, महसूल कर्मचारी तृतीय वर्ग संघटना
कारागृह मुद्रणालय कामगार संघ
संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी राष्टीय मध्यवर्ती कारागृह संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पेशकर तर राष्ट्रीय ओद्योगिक मुुद्रणालय कामगार संघाचे श्रीधर तराडे यांनी व्दार सभा घेतल्या. मुद्रणालयातील कर्मचारी संपात सहभागी होतील.
बुधाजी सूरकर
कोषाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी संघटना
राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ
११ राष्ट्रीय कामगार संघटनांनी १२ मागण्यासाठी २ सप्टेंबरचा संप पुकारला आहे. या संपात इंटक, आयटक, बी.एम.एचएमएस, सीटू आदी प्रमुख संघटनांच्या माध्यमातून संप यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे. हा संप यशस्वी होईल.
प्रदीप कोकास
जनसंपर्क अधिकारी, राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ
सार्वजनिक बांधकाम विभाग
२ सप्टेंबरच्या देशव्यापी संपाला सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटनेचा पाठिंबा आहे. परंतु सरकारने आश्वासन दिल्याने संघटना या संपात सहभागी होणार नाही.
नरेश साखरे, अध्यक्ष,
सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटना
बँक एम्प्लॉईज फेडरेशन
११ राष्ट्रीय ट्रेड युनियन व आॅल इंडिया असोसिएशनच्या आवाहनानुसार देशभरातील बँक कर्मचारी या संपात सहभागी होत आहे. बँक एम्प्लाईज फेडरेशन ईस्टर्न, महाराष्ट्रने यात सहभागी होण्याचा निणंय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी संप यशस्वी करावा व कस्तूरचंद पार्क येथील सभेत सहभागी व्हावे.
व्ही.व्ही.असई, जनरल सेक्रेटरी
ग्रामसेवक युनियन
२ सप्टेंबरला कर्मचारी व कामगारांच्या विविध मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने घेतला आहे. हा संप शंभर टक्के यशस्वी होईल.
मोरेश्वर काकडे
अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन
राष्ट्रव्यापी संपात काही संघटनांचा सहभाग नाही
देशव्यापी संपात सहभागी न होण्याचा निर्णय काही कर्मचारी व कामगार संघटनांनी घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारने काही मागण्यावर सहमती दर्शविली असल्याने संपात सहभागी न होण्याचा निर्णय भारतीय मजदूर संघ, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आदी संघटनांनी घेतला आहे.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ
केंद्रीय कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. परंतु मागण्यात मागासवर्गीयांची एकही मागणी नसल्याने कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
कृष्णा इंगळे
अध्यक्ष,कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,म.रा.
भारतीय मजदूर संघ
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यावर सहमती दर्शविली आहे. किमान वेतन निर्धारणाबाबत भारतीय श्रमिक संमेलन आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार वेतन निर्धारित केले जाणार आहे. त्यामुळे संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरेश चौधरी
प्रसिद्धी प्रमुख, भारतीय मजदूर संघ
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ
कर्मचारी संघटनांनी संप पुकारताना कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाला विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
भैया शेलारे
उपाध्यक्ष,कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ
जि.प.कर्मचारी युनियन
केंद्र व राज्य सरकारचे कामगार विरोधी धोरणाला विरोध तसेच पाच दिवसाचा आठवडा लागू करावा, केंद्राप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना लाभ मिळावे. रिक्त पदे तातडीने भरावी. आदी मागण्यासाठी पुकारलेल्या लाक्षणिक संपात विविध संघटना संपात सहभागी होत आहे. हा संप शंभर टक्के यशस्वी होईल,
संजय सिंग,
अध्यक्ष, म.रा.जि.प.कर्मचारी युनियन नागपूर
संयुक्त कृती समिती
देशव्यापी संप यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कामगार व कर्मचारी कामावर जाणार नाही. ते कस्तूरचंद पार्क येथील जाहीर सभेत सहभागी होतील. विविध संघटनांचा पाठिंबा असल्याने हा संप शंभर टक्के यशस्वी होईल.
अशोक दगडे,
निमंत्रक, कामगार संघटना संयुक्त कृती समिती
बांधकाम कर्मचारी संघटना
पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागातील ३ हजाराहून अधिक कर्मचारी या संपात सहभागी होत आहे. कर्मचाऱ्यांनी दर्शविलेला पाठिंबा लक्षात घेता हा लाक्षणिक संप शंभर टक्के यशस्वी होण्यात कोणतीही शंका नाही.
प्रतिभा सोनारे
कार्याध्यक्ष,महाराष्ट्र राज्य पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघटना
जि.प.कर्मचारी महासंघ
जिल्हा परिषदेतील अभियंते, लेखा कर्मचारी,लिपीक वर्ग, आरोग्य विभागातील कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी या संपात सहभागी होत आहे. कर्मचाऱ्यांचा मिळत असलेला पाठिंबा विचारात घेता हा संप यशस्वी होण्यात कोणतीही शंका नाही.
गोपीचंद कातुरे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी महासंघ
आयुर्विमा कर्मचारी महासंघ
भारतीय आयुर्विमा महामंडळात हा संप यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कर्मचारी संपात सहभागी होऊ न आपापल्या कार्यालयापुढे सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करतील.
अनिल ढोकपांडे
सरचिटणीस, विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियन
महसूल कर्मचारी संघटना
नागपूर महसूल विभागातील सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार २ सप्टेंबरच्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय विभागीय महसूल कर्मचारी संघटनेने घेतला आहे हा संप शंभर टक्के यशस्वी होईल.
गोपाल ईटनकर
अध्यक्ष,विभागीय महसूल कर्मचारी संघटना
जि.प.कर्मचारी महासंघ
२ स्प्टेंबरचा संप हा देशव्यापी आहे. काही संघटनांनी महाराष्ट्रात संप मागे घेतल्याचा अपप्रचार चालविला आहे. परंतु कर्मचारी याला बळी पडणार नाही. हा संप शंभर टक्के यशस्वी होईल
एन.एल.सावरकर
सरचिटणीस, जि.प.कर्मचारी महासंघ