कर्मचारी निवडणुकीत व्यस्त ; कर वसुली ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 09:36 PM2019-03-26T21:36:18+5:302019-03-26T21:37:28+5:30

महापालिकेच्या स्थायी समितीने मालमत्ता विभागाला २०१८-१९ या वर्षात कर वसुलीचे ५०९ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. परंतु प्रयत्न करूनही २५ मार्चपर्यंत मालमत्ता करातून १९१ कोटींचा महसूल जमा झाला. ३१ मार्चला पाच दिवसांचाच कालावधीत शिल्लक असल्याने आता ३१८ कोटींची वसुली शक्य नाही. त्यातच महापालिकेच्या मालमत्ता विभागातील ९५ टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने कर वसुली ठप्प पडली आहे.

Employees engage in elections; Tax recovery stopped | कर्मचारी निवडणुकीत व्यस्त ; कर वसुली ठप्प

कर्मचारी निवडणुकीत व्यस्त ; कर वसुली ठप्प

Next
ठळक मुद्दे५०९ कोटींचे उद्दिष्ट, वसुली १९१ कोटी : पाच दिवसात उद्दिष्ट अशक्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीने मालमत्ता विभागाला २०१८-१९ या वर्षात कर वसुलीचे ५०९ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. परंतु प्रयत्न करूनही २५ मार्चपर्यंत मालमत्ता करातून १९१ कोटींचा महसूल जमा झाला. ३१ मार्चला पाच दिवसांचाच कालावधीत शिल्लक असल्याने आता ३१८ कोटींची वसुली शक्य नाही. त्यातच महापालिकेच्या मालमत्ता विभागातील ९५ टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने कर वसुली ठप्प पडली आहे.
सर्वेक्षणानुसार शहरात ५ लाख ७८ हजार मालमत्ताचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यातील ४ लाख ८० हजार ४१९ मालमत्ताधारकांना डिमांड जारी करण्यात आलेल्या आहेत. सर्वेक्षणात नवीन मालमत्ता आढळून आल्याने ५०९ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु सर्वेक्षणात अनेक मालमत्ताच्या वापरात बदल करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच एकाच मालमत्तेला एकाहून अधिक युनिट दर्शविण्यात आले आहे. यामुळे कर सर्वेक्षणानंतर अपलोड करण्यात आलेला डाटा सदोष असल्याने कर वसुली करताना कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासकीय कार्यालयांकडे ६० कोटींची थकबाकी आहे. बंद मल्टिप्लेक्स ३४ कोटी, मॉल १० कोटी, इंटरनॅशनल हब व विमानतळाकडे १८ कोटी, व्हीएनआयटीकडे १२ कोटी, कंटेनर कॉर्पोरेशनकडे १८ कोटी यासह अन्य मोठे थकबाकीदार आहेत. उर्वरित पाच दिवसात २५ ते ३० कोटींची वसुली होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता या वर्षातील वसुली २२० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरही २८९ कोटींची कर वसुली होणार नाही.
१५ दिवसांपूर्वी कर आकारणी व कर वसुली समितीच्या बैठकीत ३१ मार्चपर्यंत उद्दिष्टाच्या ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार विभागातील अधिकारी व कर्मचारी कामाला लागले होते. किमान २५० कोटींची वसुली होईल असा अंदाज होता. मात्र निवडणुकीच्या कामात विभागातील २०० कर्मचारी लागल्याने वसुलीची प्रक्रिया ठप्प पडली आहे.
वसुली २२५ कोटीपर्यंत जाईल
मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मालमत्ता कराची अधिक वसुली होते. परंतु झोन कार्यालयातील मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांची निवडणुकीत ड्युटी लावण्यात आली आहे. यामुळे जप्ती व वॉरंट बजावण्याची प्रक्रिया ठप्प पडली आहे. याचा वसुलीवर परिणाम झाला आहे. २५ मार्चपर्यंत १९१ कोटींची वसुली झाली आहे. मार्चंच्या शेवटच्या आठवड्यात अधिक वसुली होते. याचा विचार करता यंदाच्या वर्षात मालमत्ता कराची वसुली २२५ कोटीपर्यंत जाईल, असा विश्वास मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी व्यक्त केला.

Web Title: Employees engage in elections; Tax recovery stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.